Maharashtra Cabinet Decisions : राज्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची मेहनत आणि त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रोख पारितोषिक योजनेत सुधारणा करण्यास आणि तिचा विस्तार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या नवीन निर्णयानुसार, नॅशनल गेम्स (National Games), खेलो इंडिया (Khelo India) तसेच दिव्यांगांच्या आणखी 6 प्रमुख स्पर्धांचा या पारितोषिक योजनेत नव्याने समावेश करण्यात आला आहे.
खेळाडूंच्या कष्टाला प्रोत्साहन, पारितोषिकांमध्ये भरीव वाढ!
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) August 24, 2026
नॅशनल गेम्स, खेलो इंडिया तसेच दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बक्षिसात वाढ — सुवर्ण ₹७ लाख, रौप्य ₹५ लाख आणि कांस्य ₹३…
केंद्राच्या आणि इतर क्रीडा-प्रगत राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पदकांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे:
नॅशनल गेम्स / राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा:
सुवर्ण पदक: 7 लाख रुपये (पूर्वी 5 लाख)
रौप्य पदक: 5 लाख रुपये (पूर्वी 3 लाख)
कांस्य पदक: 3 लाख रुपये (पूर्वी 1.5 लाख)
युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिम्पिक:
सुवर्ण पदक: 50 लाख रुपये (पूर्वी 22.50 लाख)
रौप्य पदक: 30 लाख रुपये (पूर्वी 15 लाख)
कांस्य पदक: 20 लाख रुपये (पूर्वी 7.5 लाख)
इतर महत्त्वाच्या स्पर्धा:
वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स: सुवर्ण 10 लाख, रौप्य 7 लाख, कांस्य 5 लाख रुपये.
खेलो इंडिया (सर्व प्रकार): सुवर्ण 3 लाख, रौप्य 2 लाख, कांस्य 1 लाख रुपये.
या योजनेचा विस्तार करताना लोकप्रिय खेळांमधील मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांनाही या योजनेत जोडले गेले आहे:
टेनिस (ग्रँड स्लॅम): विजेत्या खेळाडूला 3 कोटी रुपये तर उपविजेत्यास 2 कोटी रुपये दिले जातील.
बॅडमिंटन (थॉमस कप, उबर कप, सुदीरमन कप): विजेत्यास 40 लाख रुपये आणि उपविजेत्यास 20 लाख रुपये मिळतील.
हॉकी (अझलन शाह कप व चॅम्पियन्स ट्रॉफी): विजेत्यास 40 लाख तर उपविजेत्यास 20 लाख रुपये मिळतील. सुलतान जोहर कप (कनिष्ठ) विजेत्यास 20 लाख तर उपविजेत्यास 10 लाख रुपये मिळतील.
खेळाडूंच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांचाही (Coaches) सन्मान केला जाणार आहे. खेळाडूला मिळणाऱ्या रोख पारितोषिकाच्या 10 टक्के रक्कम मार्गदर्शकांना बक्षीस म्हणून दिली जाईल. हे पारितोषिक कमाल तीन मार्गदर्शकांमध्ये खालीलप्रमाणे विभागले जाईल:
प्राथमिक प्रशिक्षण देणारे: 30 टक्के
कौशल्य विकास करणारे: 30 टक्के
अंतिम व प्रगत प्रशिक्षण देणारे: 40 टक्के
कर्णबधीर (डेफ), अंध आणि विशेष ऑलिम्पिक स्पर्धांसाठी नव्याने तरतूद करण्यात आली आहे. यात डेफ ऑलिम्पिक, आयबीएसए वर्ल्ड चॅम्पियनशिप, अंध क्रिकेट वर्ल्ड कप आणि विशेष ऑलिम्पिक सारख्या महत्त्वाच्या 6 स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय सहभागी देशांच्या संख्येनुसार मिळणाऱ्या बक्षीसांच्या टक्केवारीच्या अटी शिथिल करण्यात आल्या असून लवकरच याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला जाईल.
ही बातमी वाचा;