श्रेयस दराडे जिल्हास्तरीय पुस्तीमध्ये अव्वल
Marathi August 25, 2026 08:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत श्रेयस दराडेने बाजी मारत अव्वल क्रमांक पटकावला.

होरायझन अकादमीच्या श्रेयसने या स्पर्धेत 14 वर्षांखालील 75 किलो वजनी गटामध्ये दमदार कामगिरी केली आणि त्यामुळेच त्याला विजेतेपद मिळवता आले. या जेतेपदामुळे आता त्याची आगामी विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

भगूर येथील बलकेवाडी व्यायामशाळेत या स्पर्धा पार पडल्या. श्रेयसला क्रीडा शिक्षक शरद चव्हाण, योगेश उगले, तेजस्विनी घुगे आणि मीना उगले यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.