प्रतीतीची आघाडी, मयंकचा दबदबा कायम
Marathi August 25, 2026 09:24 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आशियाई ज्युनियर मुलींच्या क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीअखेर डावपेचांचा रंग चढला असून, अव्वल मानांकित प्रतीती बोरदोलोईने थेट एकहाती आघाडीवर झेप घेतली आहे. प्रतीतीने आद्या गौडाचा अचूक डावपेचांनी पराभव करत सात सामन्यांत सहा गुणांची कमाई केली. तसेच मुलांमध्ये मयंक चक्रवर्तीने 6 गुणांसह आपला दबदबाही कायम राखला आहे. सातव्या फेरीत त्याला विग्नेश अद्वैत वेमुलाने आघाडीच्या पटावर बरोबरीत रोखले. मात्र मयंकच्या खात्यात 6 गुण आहेत.

सातव्या फेरीपूर्वी संयुक्त आघाडीवर असलेल्या तुर्पमेनिस्तानच्या शोहराडोवा लेयलाला शिवमशिका जीने बरोबरीत रोखले. त्यामुळे लेयलाचा वेग मंदावला आणि ती 5.5 गुणांवर घसरली. दुसरीकडे  प्रिशिता गुप्ताने डब्ल्यूएफएम निवेदिता व्ही. सी.वर मात करत थेट 5.5 गुणांवर झेप घेतली. कझाकिस्तानच्या मारिया खोलीयाव्को आणि  दक्षिता कुमावत यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. दोघींच्या खात्यात आता प्रत्येकी पाच गुण आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.