वैभवच्या गोलंदाजीने पूर्व विभागाचा विजय
Marathi August 26, 2026 09:24 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पूर्व विभागाच्या विजयात वैभव सूर्यवंशीची फलंदाजीऐवजी गोलंदाजीची चमक पाहायला मिळाली. वैभवने एकाच षटकात दोन फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी केली आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या वैभवला दोन्ही डावांत आपल्या बॅटची करामत दाखवता आली नाही. पूर्व विभागाने या सामन्यात उत्तर-पूर्व विभागावर एक डाव आणि 210  धावांनी दणदणीत विजय साकारला.

एकाच षटकात दोन फलंदाज नंतर

वैभव सूर्यवंशीने या सामन्यात एकाच षटकात दोन फलंदाज बाद केले. त्याने 28 व्या षटकाच्या दुसऱया चेंडूवर किशन लिंगडोहला आणि त्यानंतर त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर इमलीवती लेमतूरला बाद केले. किशन लिंगडोह 25 धावांवर, तर इमलीवती 4 धावांवर बाद झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.