कराटेपटू आराध्या माळीला ‘महापौर क्रीडा शिष्यवृत्ती’
Marathi August 26, 2026 10:25 AM

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या (उपविभाग शारीरिक शिक्षण) वतीने आयोजित महापौर क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात प्रतीक्षानगर मराठी शाळा क्र. 2 च्या कराटेपटू आराध्या  माळीला राज्यस्तरीय उत्पृष्ट कामगिरीबद्दल महापौर क्रीडा शिष्यवृत्तीने रोख बक्षिस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला शिक्षण विभागातील उपायुक्त  डॉ. प्राची जांभेकर, निखिल व्यास, दीपाली पाटील, अधीक्षक शोभा वडियार, जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव,सत्यशील कांबळे, चंद्रकांत घोडेराव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता वळवी, माधवी पोळके, कराटे मास्टर जयेश कदम, प्रशिक्षक वैष्णवी रेडीज, आयुष्मान तेलंगे आणि यश माळी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.