मोठी बातमी! मुंबईत कंत्राटदाराचे टोकाचं पाऊल; 'वेळेत काम करूनही 10 वेळा चकरा मारल्या, पण...; कार्यकारी अभियंत्यांना वर्षभरापूर्वी लिहलं होतं पत्र
सुरज सावंत August 26, 2026 02:13 PM

Mumbai News : मुंबई शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये कंत्राटदार (Government Contractor) गजानन देवकाते  (Gajanan Devkate) यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. बिल थकल्या प्रकरणी त्यांनी वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्रही लिहिलेलं होतं. काम केलं तरी वेळेत बिल मिळत नाही. बिलासाठी दहा वेळा चकरा माराव्या लागत असल्याचा या पात्रात उल्लेख होता. परिणामी सततच्या मानसिक आणि आर्थिक त्रासातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे. तर सरकारकडे आता 90 कोटी रुपये थकले आहे. अशातच राज्यात पुन्हा एकदा एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून राज्यातील ही दुसरी घटना असल्याचे बोललं जात आहे. (Mumbai Contractor News)

Mumbai Contractor News : वर्षभरापूर्वी पत्रातून मांडली होती व्यथा, पण....

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून ज्या कंत्राटदरांचे बिल थकले आहेत त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे दिसून आलं आहे. तर नुकतीच राज्यातील कंत्राटदरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या पुढे मांडला होता. असे असताना मुंबईमध्ये कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली असून या मुद्द्यवरून राजकारण देखील तापण्याची शक्यता आहे. खरं तर एका कंत्राटदराने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. कंत्राटदार गजानन देवकाते हे नवी मुंबईत राहतात. त्यांनी मुंबई महापालिकेचे 2 कोटी रुपयांचे काम केलं होतं. या संदर्भात त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच वर्षभरापूर्वी त्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांनाही पत्र लिहिलेलं होतं. माझं कुटुंब आणि त्याचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो असेही ते यात म्हणाले होते. कामं करून पैसे मिळत नसेल तर आम्ही जगायचं कसं? असा प्रश्नही त्यांनी या पात्रातून केला होता. मात्र असं असताना प्रशासनाने त्यांची वेळीच दखल नं घेतल्याने अखेर कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं.

इतर महत्वाच्या बातम्या  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.