पाचशे रुपयांची लाच भोवली; उल्हासनगर न्यायालयाची महिला सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात
Marathi August 26, 2026 02:26 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सायबर फसवणुकीच्या प्रकरणात गोठवलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी न्यायालयात दाखल दोन अर्जावर ‘से’ देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उल्हासनगर न्यायालयाच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांना ठाणे एसीबीने रंगेहाथ पकडले. सुषमा पाटील असे लाचखोर सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे नाव आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार अधिवक्त्यांच्या अशिलांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले होते. सहाय्यक सरकारी वकील सुषमा पाटील यांनी प्रत्येक अर्जासाठी ५०० रुपये याप्रमाणे लाच मागितली. दरम्यान ६ व ११ ऑगस्टला सापळा रचला होता. मात्र संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारली नाही. अखेर आज अवघे ५०० रुपयांची लाच घेताना सुषमा पाटील यांना ठाणे एसीबीने रंगेहाथ पकडले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.