साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 13 सप्टेंबर 2026 ते शनिवार 19 सप्टेंबर 2026
Marathi September 13, 2026 10:26 AM

>> नीलिमा प्रधान

मेष – तडजोडीची भूमिका घ्या

रवि, मंगळ राश्यांतर श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी करताना काळजी घ्या. दुखापत टाळा. नोकरीत तडजोडीची भूमिका घ्यावी लागेल. धंद्यात संयम ठेवा. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वादग्रस्त मुद्दे मांडू नका. तणाव वाढवू नका. शुभ दिवस. 14, 15

वृषभ – वाद वाढवू नका

रवि, मंगळ राश्यांतर. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याकडे लक्ष द्या. श्रीगणेशाचे आगमन लाभदायक ठरेल. नोकरीत बदल होईल. धंद्यात उधारी नको. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका. शुभ दिवस. १३, १६

मिथुन – प्रगतीचा मार्ग लाभेल

रवि, मंगळ राश्यांतर. ज्या क्षेत्रात असाल तिथे प्रगतीचा पर्याय मिळेल. अनाठायी खर्च टाळा. वेळेचा सदुपयोग करा. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. श्रीगणेशाचे आशीर्वाद मिळतील. शुभ दिवस. 14, 15

कर्क – नवे परिचय होतील

रवि, मंगळ राश्यांतर. आत्मविश्वास, उत्साह वाढविणाऱ्या घटना घडतील. अहंकार, संताप नको. नवे परिचय होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. श्रीगणेशाच्या उत्सवाची तयारी श्रद्धेने करा. शुभ दिवस. १३, १७

सिंह – वाहनाचा वेग कमी ठेवा

रवि, मंगळ राश्यांतर. रागाचा पारा वाढू देऊ नका. वाहनाचा वेग कमी ठेवा. श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी करताना अहंकार नको. कायद्याच्या चौकटीत रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कडवट भाषा वापरू नका. चातुर्याने वागा. शुभ दिवस. 13, 14

कन्या – धीर धरा

रवि, मंगळ राश्यांतर. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. गैरसमज वाढतील. मोठेपणाची भावना, टीका उपयुक्त ठरणार नाही. नोकरीत सहनशिलता बाळगा. धंद्यात चूक नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मदत करताना नम्रता ठेवा. शुभ दिवस. १७, १८

तूळ – रागावर ताबा ठेवा

रवि, मंगळ राश्यांतर. वादविवाद टाळा. रागावर ताबा ठेवा. दुखापत होऊ न देता कामे करा. तुमच्या मर्जीने सर्व वागतील असे गृहित धरू नका. नोकरीत दगदग होईल. दडपण दूर होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. शुभ दिवस. १८, १९

वृश्चिक – यशप्राप्ती होईल

रवि, मंगळ राश्यांतर. वेळेला महत्त्व द्या. आळस नको. इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. चातुर्य वापरा. यशप्राप्ती होईल. नोकरीत उतावळेपणा नको. कर्ज वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दिवस. १३, १८

धनु – प्रवासात धोका टाळा

रवि, मंगळ राश्यांतर. अहंकार, क्रोध यामुळे यशप्राप्ती होणे कठीण. श्रीगणेशाच्या कृपेने सर्व ठीक होईल. प्रवासात धोका टाळा. नोकरीधंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चेत संयम राखा. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. शुभ दिवस. 13, 14

मकर – कार्याला दिशा मिळेल

रवि, मंगळ राश्यांतर. श्रीगणेशाच्या कृपेने तुमच्या कार्याला नवी दिशा मिळेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अहंकार दूर ठेवा. मनातील इच्छा पूर्ण करण्यात श्रीगणेश मदत करतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांमधील त्रुटी समजून घ्या. शुभ दिवस. १६, १७

कुंभ – प्रकृतीची काळजी घ्या

रवि, मंगळ राश्यांतर. भावनांच्या जाळ्यात अडकू नका. संतापजनक घटना घडतील. अपमान सहन करावा लागेल. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ राहून अभ्यास करा. शुभ दिवस. 14, 15

मीन – नाराज होऊ नका

रवि, मंगळ राश्यांतर. तुम्ही ठरविल्यानुसार कामे पूर्ण होतील असे समजू नका. संयम ठेवा. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. नोकरीत सहनशिलता राखा. श्रीगणेशाच्या उत्सवात नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कमी बोला. शुभ दिवस. १३, १७

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.