पूनम ढिल्लोन, पद्मिनी कोल्हापुरेंसह अभिनेत्रींमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; एकमेकींशी कचाकचा भांडल्या, पोलीस भडकले अन् म्हणाले...
भाग्यश्री कांबळे September 13, 2026 10:43 AM

Poonam Dhillon Padmini Kolhapure: शुक्रवारी मुंबईतील सिने आणि टिव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या  (CINTAA) कार्यालयात मोठा गदरोळ  झाला असल्याचं पाहायला मिळालं.  कागदपत्रांवरुन  असोसिएशनच्याच्या संबंधित कलाकारांमध्ये (Bollywood Actress) कार्यालयात   वाद पेटला. वाद इतका विकोपाला गेला की,   पोलिसांना (Police) यात हस्तक्षेप करावं लागलं.  तसेच प्रकरण शांत करावे लागले.   यावेळी पूनम ढिल्लोन, पद्मिनी कोल्हापुरे, उपासना सिंह आणि कुनिकासह  इतर कलाकार सर्वांसमोर एकमेकांशी वाद घालताना दिसले.   या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय? कोणत्या विषयावरुन वाद निर्माण झाला? वादामागचं कारण काय? याची माहिती आता समोर आली आहे.  

CINTAAच्या कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं? (CINTAA Office Clash Poonam Dhillon Padmini Kolhapure)

कुनिका सदानंद यांनी आरोप केला की,  CINTAA चे काही  अधिकृत कागदपत्रे आणि फाईल्स पूनम ढिल्लोनच्या गाडीतून नेण्यात आले, असं त्यांनी म्हटलं.  यानंतर याचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत काही सदस्य पद्मिनी कोल्हापुर यांच्यासमोर प्रश्न चिन्ह उपस्थित करत असल्याचं दिसत आहे. अधिकृत कागदपत्रे नेल्याचे कबूल करता का? असा प्रश्न विचारल्यावर अभिनेत्रीने समिती बरखास्त करणारे पत्र दाखवण्याची मागणी केली. यावेळी पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होती.  पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.   

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Thikana (@bollywood_thikana)

पोलिसांनी सांगितले की, आपण तिसरे पक्ष आहेत, तसेच  सर्व जण त्यांच्यासाठी  समान आहेत, असंही सांगितलं.  यावेळी पद्मिनी कोल्हापुरे यांनी दावा केला की,  त्यांचा डेटा चोरीला गेला. पुनम ढिल्लोन यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  ANIशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.  दरम्यान, दुसऱ्या व्हायरल व्हिडीओवर आपण पाहू शकता की, आपल्या गाडीच्या तपासणीवर पूनम प्रश्न उपस्थित करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ कुनिका यांनी रेकॉर्ड केलं असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी दोघांमधील वाद विकोपाला गेला असल्याचं पाहायला मिळत आहे. वाद वाढत गेल्यामुळे यात पोलिसांना हस्तक्षेप घ्यावा लागला.

पोलीस म्हणाले की,  'मला असं बोलताना वाईट वाटतंय की,   पण झोपडपट्टी येथे राहणारे लोकही अशा रितीने बोलत नाहीत. तुम्ही कमीत कमी आपल्या प्रतिष्ठेचा विचार करा.  उपस्थित लोक तुमच्याकडे बघत आहेत.  प्रत्येकजण आपआपल्या आरोपांवर ठाम आहेत.  कुणीही ऐकायला तयार नाही.    जर कुणी दुसरं असतं, तर  मी नक्कीच एक कानाखाली मारली असती.  पण मी तुमचा सन्मान करतो. पण याची देखील एक लिमिट आहे', असं पोलीस म्हणाले. तर, आणखी एका व्हिडीओमध्ये, उपासना सिंह पोलिसांना कथिरित्या आधिच पाठवण्यात आलेले कागदपत्रे  परत मिळवण्यास सांगताना दिसत आहे. तेव्हा पोलिसांनी स्पष्ट केलं की, पेपर्स मागवणं हे त्यांचं काम नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Neena Gupta Pregnant At 67 Age: नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.