आमदार गायकवाड यांचा भीमशक्तीतर्फे निषेध
esakal September 19, 2024 11:45 PM

पिंपरी, ता. १९ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा भीमशक्तीच्या वतीने निषेध करण्यात आला. शहर भीमशक्ती युवक आघाडीच्या वतीने डॉ. आंबेडकर स्मारक पिंपरी येथे गायकवाड यांचा निषेध करण्यात आला. शहर अध्यक्ष सूरज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निषेध व जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गौतम आरकडे, मिलिंद रणदिवे, अभिमन्यू दहीतुले, हरीश डोळस, स्वाती शिंदे, प्रतिभा बनसोडे, प्रतिभा कांबळे, कपिल डोळस, विजय ओव्हाळ, गौरी शेलार, आदीसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.