सांगुर्डी उपसरपंचपदी संगीता भसे बिनविरोध
esakal September 19, 2024 11:45 PM

इंदोरी, ता. १९ ः सांगुर्डी येथील उपसरपंचपदी संगीता ऊर्फ योगिता शरद भसे यांची बिनविरोध निवड झाली. ठरल्याप्रमाणे उपसरपंच वसंत दवणे यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. सरपंच वसंत भसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक एल. सी. चव्हाण यांनी काम पाहिले. शुभांगी गाडे यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी वसंत दवणे, संदीप चव्हाण व सोनम भसे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर अभिनंदन सभा होऊन नवनिर्वाचित उपसरपंच संगीता भसे यांचा ग्रामस्थांचे वतीने सरपंच वसंत भसे व माजी उपसरपंच तुकाराम काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला. माजी अध्यक्ष कृष्णा भसे, प्रा. तृप्ती भसे, प्राचार्य मीरा भसे, उद्योजक ज्ञानेश्वर काळोखे व भीमराव काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संतोष भसे यांनी केले. आभार प्रदीप भसे यांनी मानले.
----
संगीता भसे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.