तर काय?
esakal September 20, 2024 11:45 AM

माझा मुलगा चार वर्षांचा आहे. त्याचे दात व दाढा किडल्या आहेत. त्याच्या शरीरात कॅल्शिअम कमी प्रमाणात असावे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांनी सिरप लिहून दिलेली आहेत. त्याचे २-३ केस पांढरे झालेले दिसत आहेत. डॉक्टरांच्या मते असे केस पांढरे असणे नैसर्गिक असते. मला फार चिंता वाटत आहे. त्याच्या केसांचे आरोग्य नीट राहील तसेच पुढे येणारे दात चांगले असतील यासाठी काय करावे?

- सौ. पाटील, नवी मुंबई

उत्तर - आयुर्वेदानुसार दात व केस हे दोन्ही अस्थिधातूशी, अर्थात हाडांशी निगडित असतात. शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण नीट नसले तर अशा प्रकारचे त्रास होताना दिसू शकतात. मुलाला गाईचे ताजे दूध, संतुलन चैतन्य कल्प वा संतुलन अनंत कल्प घालून नियमित द्यावे. आवडत असल्यास त्याला नियमित खजूर खायला द्यावा. डिंकाचे लाडू, खसखशीची खीर, स्वयंपाकात खोबऱ्याचा समावेश असावा.

तसेच संतुलन प्रवाळपंचामृत मोतीयुक्त गोळ्या, मॅरोसॅन रसायन देण्याचा फायदा होऊ शकेल. अनैसर्गिक कॅल्शिअम देण्यापेक्षा मुलाला नैसर्गिक कॅल्शिअमयुक्त कॅल्सिसॅनसारख्या गोळ्या दिल्यास शरीरात कॅल्शिअमचे नीट शोषण होऊन हाडांना मदत होऊ शकेल. संतुलन योगदंती चूर्णात संतुलन सुमुख सिद्ध तेल घालून तयार केलेले मिश्रण दातांवर व हिरड्यांवर लावण्याचा व नंतर कोमट पाण्याने चूळ भरण्याचा फायदा होईल.

दिवसातून रोज दोन वेळा ब्रश करणे आवश्यक. आठवड्यातून ३-४ वेळा संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेलासारखे तेल त्याच्या डोक्याला नक्की लावावे. इतक्या कमी वयात अशा प्रकारचा कमकुवतपणा असणे योग्य नाही, त्यामुळे लवकरात लवकर तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम ठरेल.

पावसाळा सुरू झाल्यापासून माझे दोन्ही गुडघे खूप दुखत आहेत. दवाखान्यात दाखवले, औषधे घेतली की तेवढ्यापुरते बरे वाटते, परत त्रास सुरू होतो. कृपया उपाय सुचवावा.

- सौ. पाठक, तळेगाव

उत्तर - पावसाळ्यात अशा प्रकारे सांधे दुखण्याचा त्रास अनेक लोकांमध्ये वाढलेला दिसतो. वात कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून २-३ वेळा तरी संतुलन शांती सिद्ध तेल हलक्या हाताने गुडघ्यामागे व गुडघ्यावर अशा दोन्ही ठिकाणी जिरवणे चांगले. फार जोरात मसाज करण्याची गरज नाही. संतुलन वातबल गोळ्या, तूप-साखरेसह संतुलन प्रशांत चूर्ण घेण्याचा तसेच, सॅन वात लेप लावण्याचा फायदा दिसू शकेल.

एकूणच हाडांच्या व सांध्यांच्या निरोगीपणासाठी मॅरोसॅन व कॅल्सिसॅन गोळ्या घेण्याचा फायदा होऊ शकेल. पत्रावरून आपले वय कळू शकलेले नाही. पण चाळिशीच्या आसपास संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्याचा फायदा मिळू शकेल. यात सांध्यांची ताकद वाढण्याच्या दृष्टीने शरीरशुद्धीनंतर वेगवेगळ्या थेरपी योजता येऊ शकतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.