Proceedings of Municipal Corporation after Ganapati Vasarjan KP
Marathi September 20, 2024 12:25 PM


राज्यभरात धूमधडाक्यात आणि उत्साहात गणपतींचे विसर्जन काल (मंगळवारी) पार पडले. या गणेशोत्सवात गणेशाच्या स्वागतासाठी तसेच स्वतःच्या राजकीय पक्षाच्या प्रसिद्धीसाठी शहर आणि उपनगरे येथील चौकाचौकात लावण्यात आलेले अनधिकृत आणि परवाना संपलेले तब्बल 14 हजार 370 बॅनर महापालिकेने कार्यवाही करून अवघ्या 18 तासांत काढले आहेत.

मुंबई : राज्यभरात धूमधडाक्यात आणि उत्साहात गणपतींचे विसर्जन काल (मंगळवारी) पार पडले. या गणेशोत्सवात गणेशाच्या स्वागतासाठी तसेच स्वतःच्या राजकीय पक्षाच्या प्रसिद्धीसाठी शहर आणि उपनगरे येथील चौकाचौकात लावण्यात आलेले अनधिकृत आणि परवाना संपलेले तब्बल 14 हजार 370 बॅनर महापालिकेने कार्यवाही करून अवघ्या 18 तासांत काढले आहेत. ( Proceedings of Municipal Corporation after Ganapati Vasarjan.)

मुंबई शहराला बकालपणा आणण्याचे काम अनधिकृत बॅनर, फलक, होर्डिंग यांच्या स्वरूपात होत असते. त्यावरून न्यायालयाने महापालिकेला अनेकदा झापले आहे. मध्यांतरी घाटकोपर येथे बेकायदेशीरपणे म्हणजे नियमांचे उल्लंघन करून 120-120 फूट लांब आणि उंच असे लावलेले होर्डिंग अचानकपणे कोसळून मोठी जिवितहानी झाली होती. त्यावरून न्यायालयाने तर पालिकेला चांगलेच फटकारले आहे. रेल्वे प्रशासनाला महापालिकेच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र तरीही रेल्वे प्रशासन अरेरावीपणा करीत आहे. नियमबाह्य होर्डिंग लावण्याचा आणि पालिका नियमांना न मानण्याचे सत्र रेल्वे प्रशासनाने सुरूच ठेवले आहे.

– Advertisement –

हेही वाचा : Ganesh Visarjan : लाडक्या गणरायाला भक्तांचा निरोप; दुपारी 3 वाजेपर्यंत विसर्जन लांबले

अनंत चतुर्दशी निमित्त प्रमुख मूर्ती विसर्जन आटोपल्यानंतर 17 सप्टेंबर मध्यरात्रीनंतर 12.30 वाजेपासून बॅनर, फलक आणि इतर प्रदर्शित साहित्य हटविण्याची कार्यवाही महापालिकेच्या अनुज्ञापन खात्याने हाती घेतली आहे. याअंतर्गत 18 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 14 हजार 370 इतके बॅनर , फलक आदी साहित्य काढून टाकण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने गणेशोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिलेले साहित्य समाविष्ट आहे. परवानगीची मुदत संपल्याने ते काढून टाकण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त अनधिकृतरित्या प्रदर्शित केलेले बॅनर, फलक, तात्पुरते प्रवेशद्वार, भित्तीपत्रके अशा सर्व बाबींचा देखील या कार्यवाहीमध्ये समावेश आहे.

– Advertisement –

हेही वाचा : Jammu and Kashmir Elections 2024 : पहिल्या टप्प्यात एकूण 58.85 टक्के मतदान; किश्तवाडमध्ये सर्वाधिक

अनुज्ञापन खात्याने हटवलेल्या साहित्याचे वर्गीकरण लक्षात घेता धार्मिक स्वरूपाचे 7 हजार 715 बॅनर, 3 हजार 174 फलक (बोर्ड) आणि 579 पोस्टर्स, राजकीय स्वरूपाचे 807 बॅनर, 705 फलक (बोर्ड), 87 पोस्टर्स व्यावसायिक स्वरूपाचे 260 बॅनर, 27 फलक (बोर्ड), 31 पोस्टर्स तसेच 985 झेंडे यांचा यामध्ये समावेश आहे. ही कारवाई निरंतर सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ( Proceedings of Municipal Corporation after Ganapati Vasarjan.)


Edited By Komal Pawar Govalkar



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.