SL vs NZ 1st Test : न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 340 धावा, श्रीलंकेविरुद्ध 35 रन्सची लीड
GH News September 20, 2024 03:14 PM

न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ऑलआऊट 340 धावा केल्या आहेत. श्रीलंकेच्या 305 धावांच्या प्रत्युत्तरात 340 धावा केल्याने त्यांना 35 रन्सची लीड मिळाली आहे. श्रीलंकेने न्यूझीलंडला 90.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. न्यूझीलंडच्या पहिल्या 7 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. त्यापैकी तिघांनी अर्धशतकी खेळीही केली. तर चौघांना संघासाठी आणखी योगदान देण्याची संधी होती. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या या चौघांना 40 धावांच्या आतच रोखलं. तर शेवटच्या 4 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे न्यूझीलंडला 350 धावांच्या आत रोखण्यात श्रीलंका यशस्वी ठरली.

न्यूझीलंडसाठी टॉम लॅथम, डॅरेल मिचेल आणि केन विलियमसन या तिघांनी अर्धशतकं केली. तिघांनी अनुक्रमे 70, 57 आणि 55 असा धावा केल्या. ग्लेन फिलिप्स 49 धावांवर नाबाद परतला. रचीन रवींद्र याने 39 धावांचं योगदान दिलं. टॉम ब्लंडेल याने 25 धावांची भर घातली. तर डेव्हॉन कॉन्वहे 17 धावांवर आऊट झाला. तर शेपटीच्या 4 फलंदाजांना काही करता आलं नाही. मिचेल सँटनर 2, कॅप्टन टीम साऊथी 3, अझाज पटेल 6 आणि विलियम ओरुर्के याने 2 धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रभाथ जयसूर्याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. प्रभाथने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रमेश मेंडीसने 3 विकेट्स मिळवल्या. तर कॅप्टन धनजंया डी सिल्वाने 2 विकेट्स घेत दोघांना चांगली साथ दिली.

पाहुण्या न्यूझीलंडकडे 35 धावांची आघाडी

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा (कॅप्टन), कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा आणि असिथा फर्नांडो.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टिम साउथी (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.