Work Pressure -कामाचा ताण, तणाव आणि उपाय
Marathi September 20, 2024 03:25 PM

पुण्यातील कंपनीत सीए असलेल्या एना सेबेस्टेयिन पेराय़िल या २६ वर्षीय तरुणीचा कामाच्या ताणामुळे मृत्यू झाला. यावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली असून कॉर्पोरेट क्षेत्र तेथील आव्हान आणि त्यातून कर्मचाऱ्यांवर येणारा शारिरीक आणि मानसिक ताण पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. मात्र अशा परिस्थितीत वेळीच योग्य खबरदारी घेतली, उपाय केले तर अनर्थ टाळता येणे शक्य असल्याचे तज्त्रांनी म्हटले आहे.

कारण जगण्यासाठी अर्थाजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय हे दोन पर्याय आहेत. तसेच या दोन्हीमध्ये कामाचा ताण येणेही अपेक्षित आहे. कारण नोकरी किंवा व्यवसाय करताना कामातून स्व:तला सि्दध करावे लागते. पण याचा अर्थ ताण असल्याने व्यवसाय किंवा नोकरी करूच नये असा होत नाही. तर येणारा ताण कसा हाताळावा हे तंत्र प्रत्येकाने आत्मसात करायला हवे. ज्याला स्ट्रेस मॅनेजमेंट असे म्हणतात. त्यासाठी आपल्याला कामाचा ताण येतो म्हणजे नेमके काय होतं हे ओळखता यायला हवं. त्यानुसार तज्त्रांची मदत घेऊन तातडीने उपाय घ्यायला हवेत. सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. यामुळे या स्पर्धांमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर स्व:तला मानसिकरित्या आणि शारिरीकरित्या खंबीर बनवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कामाचा ताण हाताळणं हे कौशल्य असून त्यासाठी आधीपासूनच मानसिक तयारी करणेही गरजेचे आहे.

तसेच जर अशी समस्याग्रस्त संबंधित व्यक्ती तुमच्या जवळची असेल आणि ती सतत तणावात असेल तर तिच्याशी बोलून तुम्ही त्याचा ताण हलका करू शकता. प्रसंगी तज्ज्ञांची मदत त्याला मिळवून देऊ शकता.

कामाचा ताण कसा ओळखावा?

जर ऑफिसच्या कामामुळे तुम्हाला सतत थकवा, निद्रानाशाचा त्रास होत असेल, भूकच लागत नसेल, तुम्ही सतत आजारी पडत असाल, कामाच्या विचारानेही छातीत धडधडत असेल अस्वस्थ वाटत असेल, आत्मविश्वास कमी झाला असेल , आपल्याकडून काम होईल का? अशी सतत शंका वाटत असेल तर लगेचचं तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारणं तुमचं मन आजारी पडू लागल्याची ही लक्षणे आहेत. ज्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत आहे.

तणावाचा सामना असा करा

सध्याच्या काळात कामाचा ताण वाढल्यामुळे अनेकांना तणाव जाणवतो आणि हा ताण इतका वाढतो की तो हळूहळू तुमच्या स्वभावात आणि वागण्यात दिसू लागतो. तथापि, असे काही उपाय आहेत ज्याद्वारे आपण कामाच्या ओझ्यामुळे येणारा ताण किंवा तणाव दूर करू शकता.

दिवसाची सुरुवात

ध्यान करा

त्यामुळे तुमचे मन शांत होईल.

जर तुम्ही दिवसाची सुरुवात आनंदात केली नाही तर त्याचा तुमच्या व्यावसायिक जीवनावरही परिणाम होतो.

यामुळे दिवसाच्या सुरुवातीला मनात चांगले विचार आणा.

तुम्हाला दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करावी लागेल त्यामुळे तुमचा दृष्टीकोनही बदलेल.

कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा वाद टाळण्याचा प्रयत्न करा.

गॉसिप करू नका

बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी धर्म आणि राजकारणाबद्दल गॉसिप सुरू होते. या गप्पांमुळे कधी कधी वातावरण तापते.

अशा विषयांवर चर्चेनंतर अनेकदा वाद निर्माण होतात.

त्यामुळे अशा विषयांवर बोलणे टाळणे महत्त्वाचे आहे.

ऑफिसला उशिरा येणे टाळा आणि ऑफिसमधून लवकर निघण्याची घाई करू नका.

ऑफिसमध्ये कूल रहा

जेव्हा तुम्ही तणावाखाली काम करता तेव्हा तुम्हाला शारीरिक त्रास होतो.

त्यामुळे ऑफिसमध्ये असताना ताण न घेता आरामात काम करणं गरजेचं आहे.

शांतपणे तुमचे काम सुरू करा.

जर ताण येऊ लागला तर मायक्रो ब्रेक घ्या.

पाणी प्या. दिर्घश्वास घ्या. पुन्हा फ्रेश माईंडने कामाला सुरुवात करा.

जर कामात अडचण येत असेल तर सहकाऱ्यांची मदत घ्या.

संगीत अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तेव्हा तुम्ही संगीताची मदत घेऊ शकता.

तुमचा तणाव कमी करण्यासाठी संगीत हा एक प्रभावी मार्ग असू शकतो.

इयरफोन्समध्ये हलके संगीत ऐकून तुम्ही तुमचा तणाव दूर करू शकता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.