IND vs BAN, 1st test: भारताला धक्का! मोहम्मद सिराजला सामना सुरू असतानाच सोडावं लागलं मैदान, जाणून काय झालं
esakal September 21, 2024 02:45 PM

Mohammed Siraj Suffers Injury While Fielding: भारत विरुद्ध बांग्लादेश संघात गुरुवारपासून (१९ सप्टेंबर) कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर हा सामना होत आहे.

या सामन्यात सुरुवातीला बांगलादेशने सुरुवात चांगली केली होती, परंतु भारतीय संघाने पुन्हा सामन्यावर पकड मिळवण्यात यश मिळवले आहे. मात्र असे असतानाच भारताला दुसऱ्या दिवशी एक मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजला सामना सुरु असतानाच मैदानातून बाहेर जावे लागले आहे.

IND vs BAN 1st Test: Ravindra Jadeja काल होत्या तेवढ्याच धावांवर बाद झाला; शतकाची थोडक्यात हुलकावणी

झाले असे की बांगलादेश संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना त्यांनी ५ विकेट्स सुरुवातीलाच गमावल्या. पण त्यानंतर शाकिब अल हसन आण लिटन दास यांनी बांगलादेशचा डाव सावरला. याचदरम्यान, २३ व्या षटकात रविंद्र जडेजा गोलंदाजी करत होता.

त्याच्या चौथ्या चेंडूवर शाकिब अल हसनने स्विपशॉट खेळला. यावेळी बाउंड्री जवळ चेंडू आडवण्यासाठी सिराज गेला. चेंडू आडवण्यासाठी त्याने पूर्ण प्रयत्न केले. पण याचप्रयत्नात तो दुखापतग्रस्त झाला. चेंडू आडवल्यानंतर तो लंगडताना दिसला.

त्यामुळे भारतीय संघाचे फिजिओ मैदानात आले. त्यानंतर सिराज त्यांच्यासह मैदानातून बाहेर गेला. त्यामुळे त्याच्या जागेवर क्षेत्ररक्षणासाठी सर्फराज खान आला.

आता त्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो मैदानात पुन्हा उतरणार की नाही, याबाबत बीसीसीआयकडून सांगण्यात आलेले नाही.

IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मैदानातून बाहेर जाण्यापूर्वी सिराजने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो याला २० धावांवर बाद केले होते. तसेच जसप्रीत बुमराह आणि आकश दीप यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे ४० धावांवरच बांगलादेशने ५ विकेट्स गमावल्या होत्या.

तत्पुर्वी भारताचा पहिला डाव ९१.२ षटकात ३७६ धावांवर संपला. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ११३ धावा केल्या, तर रविंद्र जडेजाने ८६ धावा केल्या. तसेच यशस्वी जैस्वालने ५६ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना हसन मेहमुदने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर तस्किन अहमदने ३ विकेट्स घेतल्या.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.