Styling: साधा कुर्ता-पायजमा घालूनही फॅशनेबल आणि स्टाईलिश दिसण्यासाठी स्वतःच्या लूकमध्ये करा हे बदल
Mensxp September 22, 2024 01:45 AM

आधी कुर्ता-पायजमा म्हटलं की ओल्डस्कूल किंवा मोठ्याची फॅशन असे म्हटले जात असे. परंतु आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी फॅशन स्टाईल मानल्या जाणार्या याच कुर्ता-पायजम्याला आताही फॅशन सिंबाॅल समजले जाते. हे परिधान करुन कोणीली स्टाईलिश आणि फॅशनेबल दिसू शकतो. सोबतच ह्यांचा फायदा असा की तुम्ही कोणत्याही प्रसंगी हे कपडे घालू शकता. कुर्ता-पायजमा घातल्यानंतर आपण स्वतः एक वेगळेपण अनुभवू शकतो. हा नव्या फॅशन ट्रेंडचा भाग मानला जातो.

तुम्हांला ही या ट्रेंडमध्ये यायचे असल्यास जुन्या पद्धतीला मागे टाकून नव्या प्रकारे कुर्ता-पायजमा घालायला हवा.

फॅशनच्या या नव्या युगामध्ये कुर्ता-पायजमा घालण्यामध्ये किंवा त्याच्या एकूण अस्तित्वामध्ये अनेक प्रयोग केले गेले आहेत. अनेकांना अशा प्रयोगांबद्दल माहितीदेखील नाही. या एक्सपेरिमेन्टस् मध्ये तयार झालेल्या विविध स्टाईलच्या कुर्ता-पायजमा प्रकाराचा वापर स्टाईल आयकॉन मंडळींकडून केला जात आहे. चारचौघांमध्ये वेगळे दिसावे आणि स्टाईलच्या बाबतीत इतरांपेक्षा आपण पुढे असावे अशी इच्छा तुमच्या मनामध्ये असल्यास अशा ड्रेसकोडचा वापर तुम्ही नक्की करुन पहावा.

सेलिब्रिटींना फाॅलो करा.
View this post on Instagram

A post shared by Manyavar (@manyavar)

हिंदी सिनेमाच्या जुन्या नटांपासून ते आताच्या नव्या दमाच्या तरुण नटांपर्यत प्रत्येकांनी कुर्ता-पायजमा वापरला आहे. रणबीर कपूर, सैफ अली खान, अमिताभ बच्चन या बाॅलिवूड तर स्नूपडाॅग, राॅबर्ट डाउनी जुनि. यासारख्या हाॅलिवूडच्या स्टार्सनी देखील सिनेमांमध्ये कुर्ता-पायजमा घाललेले आढळले आहेत. आॅन स्क्रीनसोबत आॅफ स्क्रीनच्या दुनियेतही ही मंडळी लग्न किंवा काही खास कार्यक्रमांमध्ये हा पेहराव करतात. जर असे सेलिब्रिटी मंडळी कुर्ता-पायजमा घालत असतील तर तुम्ही घालायला काय हरकत आहे ?

सुती कपड्यांची माहिती, कॉटनचे कपडे घालण्याचे अनेक फायदे

एकदा कुर्ता-पायजमा घालून तर पहा, तुम्हांला तुम्ही या सदाबहार आणि देशी कपड्यांमध्ये काॅन्फिडट आणि कन्फर्टेबल वाटेल की तुम्ही पुन्हा-पुन्हा हे घालण्याचे कारण शोधाल.

कुर्ता घालून स्टाईलिश दिसण्यासाठी काय-काय करावे ?
View this post on Instagram

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)


पूर्वी कुर्ता हा एकाच प्रकारचा असे. परंतु आता फॅशननुसार कुर्त्यामध्येही फेरफार केलेला पाहायला मिळतो. अनेक स्टाईलिस्ट आणि डिझाइनर मंडळींनी यात अनेक पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. या प्रकारांबाबत आपण जाणून घेऊयात. म्हणजे त्याने तुम्ही स्टाईलिश दिसून इतरांपेक्षा फॅशन ट्रेंडच्या बाबतीमध्ये पुढे असाल.

i. कुर्ता-पायजमा स्टाईलिश दिसण्यासाठी लूज-फिट अशा पद्धतीने घाला.

ii. कुर्ता फिटींगमध्ये असेल, तर मग लूज पायजमा घालावा.

iiii. कुर्ता लूज असल्यास पायजमा हा कुर्त्यापेक्षा फिटेड असायला हवा.

iv. कुर्त्याची स्लीव ही दुमडून वर घ्या. दुमडून वर घेता येत नसल्यास वर खेचून घ्या.

v. लूज कुर्त्यासोबत खाकी पॅन्ट किंवा स्लिम फिट चिनोज, जीन्स घालणे हा उत्तम पर्याय असू शकतो.

सडपातळ दिसण्यासाठी लठ्ठ लोकांनी अशा पद्धतीने घालावेत कपडे

इंडो-वेस्टर्न लुक हवा असल्यास अशा प्रकारे कुर्ता घाला.
View this post on Instagram

A post shared by Manyavar (@manyavar)


सध्याच्या घडीला इंडो-वेस्टर्न लुक सर्वात जास्त ट्रेंडी आणि परफेक्ट मानला जातो. बर्यापैकी लोक हा लुक वापरुन पाहतात. अनेकांना इंडो-वेस्टर्न कपडे सूट देखील करतात. असे लूक हवे असल्यास इंडियन कुर्त्या सोबत प्रिंटेड पॅन्टस् किंवा डेनिम अशी जोडी करावी. यासोबतीला पायांमध्ये लोफर्स किंवा कफ बूट्स घालावेत. या लुकमध्ये तुम्ही एकदम परफेक्ट दिसाल.

ह्या स्टाईलिंग टिप्सचा वापर करा आणि बाॅडीने स्किनी असूनही दिसा स्टाईलिश आणि स्मार्ट

कुर्ता घालताना त्याचसोबत नेहरु जॅकेट किंवा मोदी जॅकेट घालणे त्याला अधिक बहार आणू शकते. साध्या कुर्त्यावर जॅकेट घातल्याने राॅयल फिलिंग येते. त्याच बरोबर, त्या जॅकेटच्या फिटींगकडे विशेष लक्ष द्या. जॅकेटचा कलर देखील कुर्ता-पायजमाला साजेसा हवा. बेज किंवा ब्राऊन जॅकेटसोबत तुम्ही साॅलिड रंगाचा कुर्ता घालू शकता.

पार्टीवेअर मध्ये कुर्त्याचा वापर कशा प्रकारे करावा ?
View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)


पार्टीवेअर हे नेहमी शर्ट वा टी-शर्ट यांवर मर्यादित होते. परंतु तुम्ही आता पार्टीमध्येही कुर्ता घालू शकता. सध्या पार्टीवेअर मध्ये कुर्ता ट्रेंडी मानला जातो. पार्टीमध्ये जाताना प्लेन कुर्ता (चमकदार कलर) घालून त्यासोबत वेस्ट कोट असा पेहराव करु शकता. अशा कपड्यांमध्ये तुम्ही यूनिक आणि स्टाईलिश दिसाल. या शिवाय असलेल्या अनेक पर्यायापैकी वेलवेट फॅब्रिक कुर्ता तुम्हांला छानपैकी सूट होऊ शकतो.

ब्लॅक कुर्ता-व्हाईट पायजमा असे काॅम्बिनेशनदेखील कोणत्याही पार्टीवेअरला साजेसे मानले जाते. याने तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल. हे काॅम्बिनेशन प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी सूटेबल मानले जाते. याचा अजून एक फायदा असा की, तुम्हांला याने स्लिम लुकदेखील प्राप्त होतो.

कुर्ता-पायजमा याच्या सोबतीला तुम्ही स्कार्फचे शौकीन असाल तर त्यानेदेखील तुम्हांच्या स्टाईलिश लुकला फायदा होईल.

पार्टीच्या वेळेनुसार तुम्ही तुमच्या पेहरावामध्ये बदल करायला हवा. पार्टी दुपारी असल्यास लाईट आणि माइल्ड शेडचा कुर्ता घालावा. जर संध्याकाळी वा रात्री पार्टी असेल, तर डार्क शेड असलेला कुर्ता घालू शकता. नेवी ब्लु, मरुन कलर अशा डार्क शेडच्या कुर्त्याने तुम्ही क्लासी दिसाल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.