टाकळी हाजी परिसरात पावसाची हजेरी
esakal September 22, 2024 01:45 AM

टाकळी हाजी, ता. २१ : टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरामध्ये शनिवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी सायंकाळी टाकळी हाजीच्या परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. या परिसरामध्ये बाजरी व सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. बाजरीचे पीक काढून तयार झाले आहे, मात्र सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीच्या कामाची लगबग सुरू आहे. सोयाबीन काढण्यासाठी मजुराची कमतरता भासत आहे. शेतात असलेल्या सोयाबीनला पावसाने झोडपल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. या परिसरात हजारो शेकडा क्षेत्रावर सोयाबीन पिके काढणीला आलेले आहेत. मात्र पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. मात्र मजुराची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत असून विदर्भ मधील मजुरांना दोन वेळचे जेवण व नाश्तासह चारशे रुपये हजेरी देऊन कामावर आणावे लागत आहे. त्यामुळे सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.


टाकळी हाजी : परिसरात काढणीला आलेले सोयाबिन पीक.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.