सावधान! राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, 'या' भागात पावसाचा 'यलो अलर्ट' जारी
एबीपी माझा वेब टीम September 22, 2024 11:13 AM

Maharashtra Rain News : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत तर काही ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) फटका बसलाय. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

या भागात जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशीव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा गोंदिया वगळता संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

 

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.