कितीही प्रयत्न केला तरी आयपीओ अलॉट होत नाहीये? फक्त ‘ही’ एक ट्रिक वापरा, काम झालंच म्हणून समजा!
Marathi September 22, 2024 06:25 PM

मुंबई : अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी आयपीओ घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे यातील काही आयपीओंनी तर आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. भविष्यकालीन फायदा लक्षात घेऊन काही आयपीओ तर ओव्हर सबस्क्राईब होत आहेत. एखाद्या कंपनीचा आयपीओ येताच अनेक गुंतवणूकदार त्यावर अक्षरश: तुटून पडत आहेत. मात्र अनेक किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओत शेअर्स मिळत नाहीयेत. कितीही प्रयत्न केला तरी आयपीओ अलॉट होत नसल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार नाराजीही व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काही किरकोळ गुंतवणूकदार वापरत असलेल्या ट्रिकबद्दल जाणून घेऊ या…

किरकोळ गुंतवणूकदार नेमकी काय शक्कल लढवतायत?

मनी कंट्रोल या अर्थविषयक वृत्तसंकेतस्थळाच्या एका रिपोर्टनुसार आपयीओत शेअर्स मिळावेत म्हणून किरकोळ गुंतवणूकदार शेअरहोल्डर्स या श्रेणीवर जास्त लक्ष ठेवत आहेत. शेअर बाजारावर आधिपासूनच सूचिबद्ध असलेल्या कंपन्या आपल्या उपकन्यांचे आयपीओ लॉन्च करत आहेत. उदाहरणासह सांगायचं झाल्यास बजाज हाउसिंग फायनान्सचा आयपीओ नुकताच येऊन गेला. बजाज या उद्योग समूहाच्या बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह या दोन कंपन्या याआधीच शेअर बाजारावर सूचिबद्ध आहेत.

शेअरहोल्डर्स श्रेणीचा नेमका फायदा काय?

अशा प्रकारच्या आयपीओंमधील काही भाग संबंधित उद्योग समूहाच्या कंपनीच्या शेअर होल्डर्ससाठी राखीव ठेवला जातो. म्हणजेच राखीव असलेले शेअर्स हे अशाच गुंतवणूकदारांना दिले जातात, ज्यांच्याजवळ संबंधित उद्योग समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स असतात. नुकत्याच येऊन गेलेल्या बजाज हाउसिंग फायनान्सच्या आयपीओत हीच बाब पाहायला मिळाली. त्यामुळेच एखाद्या उपकंपनीचा आयपीओ येत असेल तर गुंतवणूकदार संबंधित उद्योग समूहाच्या इतर कंपन्यांचे शेअर्स खरेदी करत आहेत. त्यानंतर शेअरहोल्डर्स या श्रेणीतून गुंतवणूकदार आयपीओसाठी अर्ज करत आहेत.

….तर लॉटरी पद्धतीने आयपीओ होतो अलॉट

ही ट्रिक वापरल्यास संबंधित कंपनीचा आयपीओ अलॉट होण्याची शक्यता वाढते. आजकाल एखादा चांगला आयपीओ आल्यास किरकोळ गुंतवणूकदार या श्रेणीअंतर्गत संबंधित आयपीओ हा ओव्हर सबस्क्राईब होत आहे. असे झाल्यास लॉटरी पद्धतीने गुंतवणूकदारांना आयपीओ अलॉट केला जातो. अशा स्थितीत शेअरहोल्डर्स या श्रेणीतून आयपीओसाठी अर्ज केल्यास तो अलॉट होण्याची शक्यता वाढू शकते.

आयपीओ अलॉट होईलच असे नाही

दरम्यान, कधी-कधी शेअरहोल्डर्स ही श्रेणीदेखील ओव्हर सबस्क्राईब होत आहे. मात्र या श्रेणीत किरकोळ गुंतवणूकदार या श्रेणीच्या तुलनेत कमी गुंतवणूकदार असतात. गुंतवणूकदार कमी असले तरी शेअरहोल्डर्स या श्रेणीत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयपीओ अलॉट होईलच, असे नाही. बजाज हाऊसिंग हा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदार या श्रेणीत 7.41 पटीने सबस्क्राईब झाला. तर शेअरहोल्डर्स या कॅटेगिरीत तो 18.54 पटीने अधिक सबस्क्राईब झाला. अशी स्थिती उद्भवल्यास गुंतवणूकदार किरकोळ आणि शेअरहोल्डर अशा दोन्ही श्रेणीत पैसे गुंतवून आयपीओ अलॉट होण्याची शक्यता वाढवू शकतात. जास्त पैसे गुंतवण्याची क्षमता असलेले गुंतवणूकदार एचएनआय या श्रेणीतही गुंतवणूक करू शकतात.

हेही वाचा :

व्होडाफोन आयडियाचा नोकिया-सॅमसंगसोबत 3.6 अब्ज डॉलर्सचा करार; जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढलं!

सोमवारी ‘हे’ चार स्टॉक देणार तगडे रिटर्न्स, जाणून घ्या टार्गेट, स्टॉपलॉस किती?

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.