आसाममध्ये सामूहिक बलात्काराची घटना
Marathi September 22, 2024 10:24 PM

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आसाममधील नागावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. नागाव जिह्यातील धिंग येथे अल्पवयीन मुलगी आपल्या लहान भावासोबत घराकडे जात असताना दोन दुचाकीस्वारांनी तिला व तिच्या लहान भावाला जबरदस्तीने उचलून निर्जनस्थळी नेले. येथे दोन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडितेच्या भावाने घटनास्थळावरून पळ काढत घरी पोहोचून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली. मात्र, तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.