AFG vs SA: मार्करमने दक्षिण आफ्रिकेची लाज राखली, अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देण्यापासून रोखलं
GH News September 23, 2024 07:15 PM

दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह स्वत:ची लाज राखत अफगाणिस्तानला क्लीन स्वीप करण्यापासून रोखलं. अफगाणिस्तानने याआधीच सलग पहिले 2 सामने जिंकून मालिकेवर नाव कोरलं होतं. त्यामुळे अफगाणिस्तानला विजयी हॅटट्रिकची संधी होती. मात्र अफगाणिस्तानला तिसऱ्या सामन्यात पहिल्या 2 सामन्यांप्रमाणे काही खास करता आलं नाही. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेलं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने एडन मार्करम याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं आणि विजय मिळवला.

अफगाणिस्तानला 50 ओव्हरही खेळता आलं नाही.अफगाणिस्तानचा डाव हा 34 षटकांमध्ये 169 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानसाठी रहमानुल्लाह गुरुबाज याने सर्वाधिक 89 धावांचं योगदान दिलं. गुरुबाजने या खेळीत 119 बॉलमध्ये 7 फोर आणि 4 सिक्स ठोकले. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी मिळालेलं 170 धावांचं आव्हान हे 33 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. एडन मार्करम याने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मार्करमने 67 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 69 धावांची खेळी केली. मार्करमने ट्रिस्टन स्टब्ससह चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी विजयी भागीदारी केली. ट्रिस्टनने नाबाद 26 धावा केल्या.

तर त्याआधी रिझा हेंड्रीक्स, कॅप्टन टेम्बा बावुमा आणि टॉनी डी झॉर्झी या टॉप ऑर्डरमधील त्रिकुटाला आश्वासक सुरुवात मिळाली होती. मात्र तिघांपैकी एकालाही या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. झॉर्झीने 26 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन टेम्बा बावुमाने 22 धावा जोडल्या. रीझा हेंड्रीक्सने 18 रन्स केल्या. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी, अल्लाह गझनफर आणि फरीद मलिक या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने विजय

अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, अब्दुल मलिक, रहमत शाह, अजमातुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर, फरीद अहमद मलिक आणि नावेद झदरन.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, ब्योर्न फॉर्च्युइन, नकाबा पीटर आणि लुंगी एनगिडी.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.