Akshay Shinde: त्याला साधी होळीची पिचकारी बंद करता येत नाही, तो गोळी कशी झाडेल? अक्षयच्या बापाने हंबडरा फोडला
esakal September 24, 2024 04:45 AM

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने सोमवारी (२३ सप्टेंबर) पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली आहे. यात त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली तेव्हा शिंदे याला पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.

या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. यावर आता अक्षय शिंदेंच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेचे वडील म्हणाले की, पोलिसांनी सांगितलेलं सगळं खोटं आहे. माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं आहे. मी त्याला नुकतचं जाऊन भेटून आलो आहेत. त्याला साधं होळीची पिचकारी बंद नाही करता येत तर तो पोलिसांनी बंदूक कुठून चालवेल. तो कधी फटाकेही वाजवत नव्हता. याबाबत पोलिसांनीही आम्हाला काही सांगितलं नाही. मी टीव्हीवर पाहिलं तेव्हा मला ही घटना समजली आहे, असं अक्षय शिंदेच्या वडिलांनी सांगितलं आहे.

Badlapur School Crime: आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी! नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

13 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूर येथील शाळेत दोन मुलींचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी शाळेतीलच सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ उडाला. लैंगिक शोषणाची घटना उघडकीस आल्यानंतर हजारोंचा जमाव लोकल ट्रेनच्या रेल्वे ट्रॅकवर उतरला, त्यानंतर दगडफेकीची घटना उघडकीस आली.

20 ऑगस्ट रोजी जमावाने आधी शाळेची तोडफोड केली आणि नंतर बदलापूर स्टेशनवर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निदर्शने केली, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकल रेल्वे रुळांवर उतरल्याने लोकल गाड्यांची वाहतूक १० तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. सायंकाळी पोलिसांनी लाठीचार्ज करून रेल्वे ट्रॅक रिकामा केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.