Badlapur Case: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर! पोलिसांनी स्वरक्षणासाठी झाडल्या गोळ्या
Times Now Marathi September 24, 2024 04:45 AM

Badlapur School Case: आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बदलापूरधील शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणातील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आरोपी अक्षय शिंदे यांने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून एक पोलिस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी अक्षयची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासााठी रुग्णालायत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

बातमी अपडेट होत आहे.........
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.