Travel: ऑक्टोबर-मार्च दरम्यान प्रवास करायचाय? भारतीय रेल्वेच्या IRCTC तर्फे फ्लाइट तिकिटांवर मिळणार प्रचंड सूट! जाणून घ्या 
एबीपी माझा वेब टीम September 28, 2024 03:13 PM

Travel : जर तुम्हाला सणांनिमित्त ट्रेनने घरी जायचंय, पण तिकीट मिळत नाही? जर तुम्ही येत्या काही दिवसात पिकनिकचा प्लॅन बनवत असाल, तर भारतीय रेल्वेच्या IRCTC (Indian Railway) तर्फे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IRCTC आपली 25 वर्षे साजरी करत आहे. जर तुम्हाला ट्रेनचे तिकीट मिळत नसेल, तर फ्लाइटने प्रवास करण्याचा प्लॅन करा. कारण भारतीय रेल्वे आपल्या वर्धापन दिनानिमित्त फ्लाइट तिकिटांवर चांगल्या ऑफर्स देत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रवाशांना 3 दिवसांसाठी फ्लाइट तिकीट बुकिंगची सुविधा मिळणार आहे. या 3 दिवसांत तिकीट बुकिंगमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही या ऑफरचा कसा फायदा घेऊ शकता आणि तुम्ही फ्लाइट तिकीट कुठून बुक करू शकता याबद्दल माहिती जाणून घ्या. लक्षात ठेवा की तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक केल्यास तुम्हाला ही ऑफर मिळेल.


IRCTC च्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध ऑफर्स


ऑफरसाठी तिकीट कसे बुक कराल?

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
येथे तुम्हाला ठिकाण आणि तारीख निवडावी लागेल.
यानंतर, तुम्ही किती प्रवाशांसोबत प्रवास करत आहात याची माहिती द्या.
तुम्ही वेबसाइट उघडताच तुम्हाला ऑफर दिसेल. 
त्यामुळे तुम्हाला त्याचा शोध घेण्याची गरज भासणार नाही.
फक्त लक्षात ठेवा की, तुम्ही भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवरून बुकिंग केल्यासच तुम्हाला ही ऑफर मिळेल.
तुम्ही येथून हॉटेल बुकिंग देखील करू शकता. 
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या ऑफर्स घेऊन येत असते.
फ्लाइट तिकीट बुक करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

 

>>>

Winter Travel : हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत स्वर्गसुख अनुभवायचंय? भारतीय रेल्वेचे नोव्हेंबर-डिसेंबर टूर पॅकेज जारी, कमी बजेटमध्ये अशी करा बुकींग

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.