संत रामजीबाबा सोसायटीच्या अध्यक्षपदी गायकवाड
esakal September 29, 2024 08:45 AM

सोमाटणे, ता. २८ ः चांदखेड येथील संत रामजीबाबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत शिवाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. चांदखेड, आढले, पाचाणे या तीन गावचे कार्यक्षेत्र असलेल्या संत रामजीबाबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. या जागेच्या
निवडीसाठी सोसायटीचे सचिव बाळासाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, पुणे जिल्हा किसान संघाचे सरचिटणीस शिवाजी गायकवाड, दीपक गायकवाड, अशोक गायकवाड, नवनाथ गायकवाड, भरत गायकवाड आदींच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे मुख्य अभियंता चंद्रकांत गायकवाड यांची सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

PNE24U49954

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.