बिग बॉस मराठीच्या इतिहासातला पहिला सोहळा, ग्रँड आठवड्यात रेड कार्पेटवर स्पर्धकांचा अनोखा अंदाज
जयदीप मेढे October 01, 2024 10:43 PM

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi New Season) आता शेवटचा आठवडा सुरु झाला असून  येत्या 6 ऑक्टोबर रोजी बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे आता हा सीझन शेवटच्या टप्प्यात असून काहीच दिवसांत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता मिळणार आहे. त्या आधी बिग बॉसच्या घरात कधीही पार पडला नव्हता असा एक सोहळा पार पडलाय. पहिल्यांदाच स्पर्धकांची रेड कार्पेटवर अनोखी झलक पाहायला मिळणार आहे. 

दरम्यान निक्कीने टास्कमध्ये बाजी पहिलं तिकीट टू फिनाले मिळवलं आहेत. त्यामुळे आता घरातील इतर स्पर्धकांमध्ये तिकीट टू फिनालेसाठी स्पर्धा सुरु आहे. त्यातच घरात आता मीड वीक नॉमिनेशन देखील होईल. त्यामुळे अगदी कोणत्याही क्षणी कोणत्याही स्पर्धकाचा खेळ संपू शकतो. पण तत्पूर्वी बिग बॉसकडून स्पर्धकांना विशेष अंदाजात त्यांचा प्रवास दाखवण्यात आला. 

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना मिळणार सरप्राईज

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना त्यांचा 70 दिवसांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. पण विशेष म्हणजे पहिल्यांदाच स्पर्धकांना त्यांचा हा प्रवास बिग बॉसच्या घराबाहेर प्रेक्षकांमध्ये दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धक एव्हिक्ट न होता ते घराबाहेर पडणार आहेत. 

बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेची एन्ट्री

 'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पर्वाचा विजेता कोण होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. 'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग सदस्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खूपच खास असणार आहे. आज घरात स्पेशल गेस्ट म्हणून 'आपला माणूस' शिव ठाकरे येणार आहे.'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"सदस्यांच्या आजवरच्या प्रवासाचे हटके सेलिब्रेशन होणार शिव ठाकरेसोबत". शिव ठाकरेने आपल्या एन्ट्रीने घरात एक वेगळाच उत्साह आणला आहे. बिग बॉस मराठीच्या एका पर्वाचा शिव ठाकरे विजेता होता. आता शेवटच्या आठवड्यात तो सदस्यांना काय टिप्स देतो हे पाहावे लागेल. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Pandharinath Kamble : 'ती गोष्ट कायम लक्षात राहिल...', जान्हवीच्या वक्तव्यावर पॅडी कांबळेने व्यक्त केलं स्पष्ट मत

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.