PAK vs SL : श्रीलंकेच्या बॉलिंगसमोर पाकिस्तान फुस्स, विजयासाठी 117 धावांचं आव्हान
GH News October 04, 2024 12:08 AM

आयसीसी वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानला श्रीलंकेच्या धारदार बॉलिंगसमोर बॉल टु बॉल रनही करता आल्या नाहीत. पाकिस्तान 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 116 धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला सुरुवातीपासून धक्के देत बांधून ठेवलं. त्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज निष्प्रभ ठरले. आता श्रीलंका 117 धावांचं आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करुन विजयी सुरुवात करणार? की पाकिस्तानचे गोलंदाज संघाला पहिल्याच सामन्यात विजयी करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पाकिस्तानची बॅटिंग

पाकिस्तानकडून एकूण 5 फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला. कॅप्टन फातिमा सना हीने सर्वाधिक 30 धावांचं योगदान दिलं. निदा दार हीने 23 धावा केल्या. ओमामा सोहेल हीने 18 रन्स केल्या. सिद्रा अमीन आणि मुनीबा अली या दोघांनी 12 आणि 11 धावांचं योगदान दिलं. नशरा संधूने नाबाद 6 धावा केल्या. तुबा हसनने 5 धावांचं योगदान दिलं. गुल फिरोजा, डायना बेग आणि साईना इक्बाल या तिघांनी प्रत्येकी 2-2 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून प्रबोधिनी, सुंगाधिका कुमारी आणि कॅप्टन चमारी अथापथू या तिघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर कविशा दिलहारी हीने 1 विकेट घेतली.

श्रीलंकेसमोर 117 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

पाकिस्तान वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: फातिमा सना (कॅप्टन), मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, तुबा हसन, नशरा संधू, डायना बेग आणि सादिया इक्बाल.

श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : चामारी अथापथु (कॅप्टन), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, सचिन निसांसाला आणि उद्देशिका प्रबोधिनी.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.