WTC 2025 : अंतिम फेरीसाठी टीम इंडियासह हे पाच संघ शर्यतीत, जाणून कोणाला किती संधी ते
GH News October 04, 2024 01:16 AM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं तिसरं पर्व सुरु आहे. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने आणि दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. भारताच्या पदरी दोन्ही पर्वात अपयश पडलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड मैदानावर होणार आहे. हा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान होणार आहे.भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. पण एखादं गणित चुकलं तर सर्व काही बिघडू शकतो. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत टॉपला आहे. तर ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. असं असलं तरी श्रीलंका, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड संघ शर्यतीत आहेत. म्हणजेच आता नऊ पैकी पाच संघांना संधी आहे. तर पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि बांग्लादेश हे संघ शर्यतीत बाद झाले आहेत. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाला किती संधी ते

भारत : टीम इंडियाचे दोन मालिका शिल्लक असून 8 सामने खेळणार आहे. भारताने न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत केलं आणि ऑस्ट्रेलियाकडून 3-1 पराभव झाला तरी 65.78 विजय टक्केवारीसह अंतिम फेरी गाठू शकते. दुसरीकडे, भारताने न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला. पण ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला क्लीन स्वीप दिला, तर विजयी टक्केवारी 58.77% पर्यंत घसरेल. अशा परिस्थितीत श्रीलंकेसाठी अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे दरवाजे खुले होतील.

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्धची मलिका 2-2 बरोबरीत सोडवली आणि श्रीलंकेत 2-0 ने विजय मिळवल्यास विजयी टक्केवारी 62.28 होईल. अशा स्थितीत अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. पण मालिका भारताविरुद्ध 2-2 ड्रॉ आणि श्रीलंकेविरुद्ध 1-1 ड्रा झाली तर विजयी टक्केवारी 57 होईल. यामुळे श्रीलंकेसह दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडलाही संधी मिळेल.

श्रीलंका : श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 पराभव झाला, तर अंतिम फेरीची संधी संपुष्टात येईल. ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करूनही विजयी टक्केवारी 53.84 पर्यंत जाईल. त्यामुळे स्पर्धेतून बाद होईल.

दक्षिण अफ्रिका : दक्षिण अफ्रिकेचे एकूण सहा सामने शिल्लक आहेत. सहापैकी पाच सामन्यात विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 61.1 टक्के होईल. त्यामुळे अंतिम फेरीची संधी मिळू शकते. पण चार सामन्यातच विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 52.77 टक्के होईल. अशा स्थितीत इतर संघाच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

न्यूझीलंड : न्यूझीलंडने उर्वरित सहा सामन्यात विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 64.29 होईल. पण एक जरी सामना गमवला तर विजयी टक्केवारी 57.14 टक्के होईल. जर भारतात 1-1 सामना ड्रॉ झाला आणि इंग्लंडला 3-0 ने पराभूत केलं तरी न्यूझीलंडला गाशा गुंडाळावा लागेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.