भारताच्या मित्रराष्ट्राने जम्मू-काश्मीरला दाखवले पाकिस्तानात, भारताने कणखर भूमिका घेताच…
GH News October 05, 2024 03:10 PM

इस्त्रायल भारताचा मित्र राष्ट्र म्हणून ओळखला जातो. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्‍याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नातेही चांगली आहे. त्यानंतरही इस्त्रायलने मोठी घोळ केला आहे. इस्त्रायल सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर पाकिस्तान व्याप्त जम्मू-काश्मीर पाकिस्तानच्या भागात दाखवला आहे. यासंदर्भात भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सोशल मीडियावर हा विषय चर्चेत आला आहे. त्यानंतर इस्त्रायलने आपली चूक मान्य करत त्यात सुधारणा केली आहे. भारतातील इस्त्रायलचे राजदूत रूवेन अजार यांनी वेबसाइटच्या संपादकाची ती चूक होती. ती त्वरीत दुरुस्त करण्यात आली आहे.

सोशल मीडियातून माहिती समोर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर युजरकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. युजरने लिहिले की, ‘भारत इस्त्रायलसोबत आहे. परंतु इस्त्रायल भारतासोबत आहे का? इस्त्रायलच्या अधिकृत वेबसाइटवर भारताचा नकाशा पाहा, त्यात जम्मू-काश्मीरकडे विशेष लक्ष द्या.’ या विषयावरुन भारतात नाराजी निर्माण झाली. सोशल मीडियावर लोकांनी इस्त्रायलच्या या भूमिकेवर जोरदार विरोध केला. तसेच ती चूक दुरुस्त करण्याची मागणी केली.

इस्त्रायलच्या राजदूतांनी मागितली माफी

भारताने नेहमी म्हटले जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरसुद्धा भारताचा हिस्सा आहे. कमीत कमी भारताच्या मित्र राष्ट्राकडून अशी चूक होऊ नये, असे सोशल मीडिया युजरकडून सांगण्यात आले. भारतात सुरु असलेल्या नाराजीची दखल भारतातील इस्त्रायलचे राजदूत रियुवेन अजार यांनी घेतली. त्यांनी म्हटले की, ‘या प्रकाराबाबत माफी मागितली. तसेच ही वेबसाइटच्या संपादकाची चूक असल्याचे म्हटले. ती आता दुरुस्त करण्यात आली आहे. तुमच्या सतर्कतेबद्दल धन्यवाद.’

जेव्हा ऑक्टोंबर २०२३ मध्ये हमासने इस्त्रायलवर हल्ला केला, त्यावेळी भारताने या हल्ल्याचा तीव्र निषध व्यक्त केला होता. कारण भारत आणि इस्त्रायलमधील संबंध नेहमी मित्रत्वाचे राहिले आहेत. दोन्ही देशांनी अनेक दशकांपासून संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांना सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या या चुकीबद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.