मोठी बातमी: नंदुरबारमध्ये भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला, 100 मेंढ्या चिरडून ठार; कोंडाईबारी घाटातील वाहतूक ठप्प
भिकेश पाटील October 06, 2024 02:13 PM

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडले (Accident) आहे. यात सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी, रस्त्यावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मेंढ्यांना चिरडल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या अपघातामुळे मेंढ्या पाळणाऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं असून एकच शोककळा पसरली आहे.

भरधाव ट्रकने 100हून अधिक मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडले

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याहून सुरतच्या दिशेने जाणारी  क्रमांक ए पी 31 पी जी 0869 या वाहनाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100हून अधिक मेंढ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.परिणामी, रस्त्यावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. तर या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघात झाल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे. कोंडाईबारी घाटात वारंवार अपघात होत असतात. मात्र उपायोजना शून्य दिसून येत आहेत. तर या अपघताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. सध्या पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र या या अपघातामुळे मेंढ्या पाळणाऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.