लाडक्या बहिण योजनेत अपहार, महिलांचे पैसे वळवले पुरुषांच्या खात्यात, नेमकी कशी केली फसवणूक?
एबीपी माझा वेब टीम October 06, 2024 02:13 PM

Ladki Bahin Yojana News : माझी लाडकी योजनेची (Ladki Bahin Yojana) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राज्य सरकारची (State Govt) ही एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेत अनेक ठिकाणी चुकीच्या गोष्टी होत आहेत. असाच एक प्रकार नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं उघडकीस आला आहे. लाडक्या बहीण योजनेतील अर्जात खाडाखोड करुन महिलांचे पैसे पुरुषाच्या खात्यात वळते करुन फरार झालेला आरोपी पोलिसांना शरण आला आहे.

लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी चालक सचिन थोरात याने महिलांच्या आधार कार्डवर खाडाखोडकरुन पुरुषाचे आधार क्रमांक टाकले, तसेच अर्ज भरताना नाव महिलेचा पण आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक पुरुषाचे दिले होते.  जवळपास त्याने तसे 33 अर्ज भरले होते. लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात पडले होते. ते पैसै स्वतःच्या खात्यात वळते करुन सचिन थोरात पसार झाला होता. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मनाठा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आरोपी सचिन थोरात पोलिसांना शरण आला. त्याला अटक करुन पोलिसांनी पुढील तपास सूरु केला आहे. 

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना पुन्हा 3000 रुपये मिळण्यास सुरुवात, बँक खाते लगेच करा चेक

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.