IND vs PAK : भारतीय गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी, पाकिस्तान विरुद्ध विजयासाठी 106 धावांचं आव्हान
GH News October 06, 2024 08:10 PM

आयसीसी वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सातव्या सामन्यात पाकिस्ताने भारताला विजयसाठी 106 धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. त्यामुळेच पाकिस्तानच्या फलंदाजांना विस्फोटक बॅटिंग करता आली नाही, परिणामी त्यांना 110 धावांच्या आत रोखण्यात भारताला यश आलं. भारताने पाकिस्तानला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानकडून फक्त एकीलाच 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या. तर तिघींना 17 धावांच्या पुढे झेप घेता आली नाही. आता भारतीय संघ हे आव्हान सहज पूर्ण करुन विजयाचं खात उघडणार की पाकिस्तान 105 धावांचा यशस्वी बचाव करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पाकिस्तानची बॅटिंग

पाकिस्तानकडून निदा दार हीने सर्वाधिक धावा केल्या. दारने 34 बॉलमध्ये 28 रन्स केल्या. ओपनर मुनीबा अलीने 17 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन फातिमा सना हीने 13 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. दोघींना भोपळा फोडता आला नाही. तर तिघींना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. शेवटी सईदा शाह आणि नशरा संधू या दोघी नाबाद परतल्या. या जोडीने केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानला 100 पार मजल मारता आली. सईदाने नाबाद 14 तर नशराने नॉट आऊट 6 रन्स केल्या. पाकिस्तान यासह 20 षटकात 8 विकेट्स गमावून 105 धावा केल्या.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. टीम इंडियाच्या एकीनेही 6 पेक्षा अधिक इकॉनॉमी रेटने धावा दिल्या नाहीत. अरुंधती रेड्डी हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. श्रेयांका पाटील हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रेणुका सिंग, दीप्ती शर्मा आणि आशा शोभना या तिघींनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

भारतीय गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : फातिमा सना (कॅप्टन), मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा आरूब शाह आणि सादिया इक्बाल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.