Orange Health Benefits : संत्र खाण्याचे फायदे आणि नुकसान
Marathi October 07, 2024 07:25 AM

संत्र हे फळ अनेकांना आवडतं. हे फळ अत्यंत रसाळ असतं. आंबटगोड चवीचं असणारं हे फळ सगळेच जण अगदी आवडीने खातात. सामान्यत: लोकांना माहित असतं की संत्रे खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे आरोग्यासाठी लाभदायक असतं. परंतु फार कमी जणांना माहीत आहे की संत्र्याचा वापर हा औषधाच्या रुपातही केला जातो.

आंबट संत्र्याच्या सेवनाने ते फार उशिरा पचते. तर कच्चे संत्र कफ, पित्त किंवा आम्लवर्धक आणि वात दूर करणारे असते. संत्र्याचा उपयोग खोकला, सर्दीसारखा आजार झालेल्यांसाठी किंवा कफ प्रकृती असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर असतो. आयुर्वेदामध्ये याच्या खूप गुणांना विस्तारित स्वरुपामध्ये सांगितलं आहे. चला जाणून घेऊयात चेंडूसारख्या दिसणाऱ्या या संत्र्याचे फायदे काय आहेत.

संत्र्याचे फायदे :

सर्दी आणि ताप घालवण्यासाठी फायदेशीर :

10-20 मिलीग्रॅम संत्र्याचा रस मधात किंवा सैंधव मीठ टाका. याच्या सेवनाने सर्दी, ताप, टीबी, अस्थमा तसेच श्वासासंबंधीचे आजार कमी होतात. संत्र्यांच्या रसाचे 1 ते 2 थेंब नाकावाटे घेतल्याने सर्दी आणि ताप निघून जातो.

हृदयविकारासाठी फायदेशीर :

संत्र्याच्या फुलाच्या रसांनी छातीला मालिश केल्यास हृदयाशी संबंधित आजार कमी होतो.
संत्र्याच्या सालींचा काढा बनवून घ्या. 10- 20 मिलीग्रॅम हे रोज प्यायल्याने हृदयरोगामध्ये लाभ होऊ शकतो.

पोटदुखीसाठी उपयुक्त :

संत्र्याच्या सालीचे चूर्ण 500 मिलीग्रॅम खाल्ल्याने पोटदुखी किंवा अपचनाच्या समस्येपासून आराम मिळतो.

संत्र्याचा उपयोग त्वचारोगासाठी लाभदायी :

संत्र्याची पानं मिक्सरमध्ये वाटून घ्या. याचा पाणी मिसळून लेप तयार करा. हा लेप चेहऱ्याला आणि केसांना लावल्यास मुरुमं आणि त्वचारोगापासून सुटका मिळू शकेल.

मलेरियामध्ये संत्रे खाण्याचे फायदे :

एका संशोधनानुसार, हे सिद्ध झालंय की संत्र्यामध्ये अँटिमलेरिया गुण असतात. जे मलेरियाविरुद्ध लढण्यासाठी सहकार्य करतात.

याशिवाय कॅन्सरशी लढा देण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी, डोळ्यांसाठी , शरीरातील रक्तपुरवठा नियंत्रणात ठेवण्यासाठीही संत्रे फायदेशीर आहे.

 


संपादन- तन्वी गुंडये

 

 

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.