Women Health: महिलांनो...'ब्युटी क्विनच्या 'त्या' आजाराबद्दल चर्चा, अनेक महिलांची वाढली चिंता, तज्ज्ञ सांगतात..
एबीपी माझा वेब टीम October 07, 2024 04:13 PM

Women Health: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन या आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात, अनेकदा महिलांना आरोग्य संबंधित समस्या असूनही त्या डॉक्टरांकडे जात नाही, त्या अंगावरच दुखणं सहन करतात. पण महिलांनो असं करणं तुमच्यासाठी तर घातक ठरेलच, सोबत तुमच्या कुटुंबासाठी देखील चिंतेचे कारण बनेल, कारण तुमचं आरोग्य चांगलं असेल, तर तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकाल. आजकाल ऐश्वर्या राय बच्चनच्या आजाराबाबत अनेक बातम्या येत आहेत. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Rai) गंभीर आजाराबद्दल लिहिले होते. ज्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.  यानंतर, ऐश्वर्याच्या वैद्यकीय स्थितींबाबतच्या बातम्या ऐकून अनेक महिलांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. अशात आपण जाणून घेऊया याचे कारण...

 

ऐश्वर्या राय तिच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल

पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये ऐश्वर्याचा (Aishwarya Rai Bachchan) लूक चांगलाच व्हायरल झाला होता. ऐश्वर्याचेही कौतुक झाले. पण, सोशल मीडियावर त्याच्या फोटोवर काही आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या. ज्यामध्ये तिच्या वाढत्या वजनामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. या चर्चेदरम्यान, सोशल मीडिया Reddit वर एक पोस्ट आली, ज्यामध्ये ऐश्वर्या रायच्या गंभीर वैद्यकीय स्थितीबद्दल लिहिले आहे. ज्यानंतर अनेक महिलांच्या चिंतेत वाढ झालीय.

 

ऐश्वर्या रायच्या आजाराबद्दल काय लिहिलंय?

सोशल मीडिया Reddit पोस्टनुसार, ''बॉलिवुडमध्ये काम केलेल्या माझ्या एका मित्राने मला सांगितले की ऐश्वर्या राय काही वर्षांपासून गंभीर आजारातून जात आहे. ज्याबद्दल मी सांगणार नाही. यामुळे ती डाएटचे काटेकोरपणे पालन करू शकत नाही. त्यामुळे तिचे वजन वाढले आहे आणि त्यासाठी ती वजन कमी करण्याची औषधे घेऊ शकत नाही. तिचा स्टायलिस्ट यासाठी जबाबदार नाही. तिला तिच्या शरीरानुसार कपडे घालायला आवडतात. "आतापर्यंत, ऐश्वर्या आणि तिच्या टीमने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा तिच्या वैद्यकीय स्थितीबद्दल कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

 


 

गर्भधारणेनंतर महिलांचे वजन वाढणे सामान्य आहे की समस्या?

ऐश्वर्या राय तिच्या वाढत्या वजनामुळे बऱ्याच दिवसांपासून ट्रोल होत आहे. मुलगी आराध्याला जन्म दिल्यानंतर म्हणजेच गर्भधारणेनंतर तिचे वजन वाढले. ऐश्वर्या आणि अभिषेक 2011 मध्ये आई-वडील झाले. त्यानंतर तिने आपलं वजन कमी देखील केलं होत, मात्र गेल्या काही वर्षात ऐश्वर्या रायचे वजन वाढू लागले. ज्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या. अनेकांचं असं म्हणणं आहे की, गर्भधारणेनंतर तिचं वजन वाढू लागलंय. आता प्रश्न पडतो की गर्भधारणेनंतर वजन वाढणे सामान्य आहे की समस्या? जाणून घ्या

 

अहवालात म्हटलंय...

इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनच्या अहवालात असे म्हटले आहे की, मुलाला जन्म दिल्यानंतर, सुमारे अर्ध्या स्त्रियांचे वजन 5 किलो किंवा त्याहून अधिक वाढते. एक चतुर्थांश महिलांचे वजन 6 महिन्यांनंतर 10 किलो किंवा त्याहून अधिक वाढते. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या सामान्य आहे. हे प्रामुख्याने हार्मोनल बदलांमुळे होते. जर जास्त वजन वाढत नसेल तर ते सामान्य मानले जाते. त्यामुळे याबाबत फारशी भीती बाळगण्याची गरज नाही.

 

गर्भधारणेनंतर 'या' गोष्टींची काळजी घ्या. 

परंतु, येथे समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जास्त वजन वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे गर्भधारणेनंतर महिलांनी वजन अचानक वाढू नये यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांची मदत घ्यावी.

 

Women Health: गरोदरपणात शरीरात अनेक बदल होतात. अशा स्थितीत महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. 12-13 वर्षे वयाच्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला 28-35 दिवसांच्या अंतराने मासिक पाळी येते. महिलांच्या आरोग्यासाठी दर महिन्याला वेळेवर मासिक पाळी येणे खूप महत्त्वाचे आहे. मासिक पाळी चुकण्याची किंवा अनियमित होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये हार्मोनल असंतुलन, तणाव आणि शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. मासिक पाळी न येणे हे गर्भधारणेचे लक्षण मानले जाते. मासिक पाळी कमी होण्याचे कारण गर्भधारणा असू शकते. सर्व महिलांना माहित आहे की, गरोदर राहिल्यानंतर मासिक पाळी येत नाही. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? स्त्रीरोग तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊया..

 

गर्भधारणेनंतर मासिक पाळी का येत नाही?

गर्भधारणेनंतर मासिक पाळी का येत नाही? याबाबत एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ अदिती बेदी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घेऊया

  • महिलांच्या अंडाशयात दर महिन्याला अंडी बाहेर पडतात. ओव्हुलेशन दोन चक्रांमध्ये होते. हे चक्राच्या सुमारे 14 दिवसांनंतर होते.
  • अंडी सोडल्यानंतर ते 24 तास टिकते. या काळात शुक्राणूंनी अंड्याचे फर्टिलायजेशन केल्यास गर्भधारणा सुरू होते.
  • फलित अंडी फॅलोपियन ट्यूबद्वारे गर्भाशयात प्रवेश करते आणि स्त्री गरोदर होते.
  • त्याच वेळी, जेव्हा या अंड्याचे फलन केले जात नाही, तेव्हा मासिक पाळी सुरू होते आणि शरीर गर्भाशयाच्या अस्तरांना बाहेर टाकते.
  • गरोदर राहिल्यानंतर ओव्हुलेशन होत नाही आणि त्यामुळे मासिक पाळी देखील येत नाही.

 

प्रसूतीनंतर महिलांना होणारा रक्तस्त्राव किती दिवस असतो?

यामागील एक कारण म्हणजे गर्भधारणेदरम्यान गर्भाशयाचे अस्तर शाबूत राहते. त्यामुळे रक्तस्त्राव होत नाही.
प्रसूतीनंतर महिलांना सुमारे 30-45 दिवस रक्तस्त्राव होतो आणि शरीरात जमा झालेले खराब रक्त बाहेर येते.
अनेक वेळा प्रसूतीनंतर महिलांना मासिक पाळी सुरू होत नाही. हे हार्मोन्समुळे होऊ शकते. याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला.
त्याच वेळी, कधीकधी गर्भधारणेच्या सुरुवातीला हलके स्पॉटिंग होऊ शकते. हे गर्भधारणेदरम्यान गर्भाशयाच्या ग्रीवेच्या पेशींमध्ये बदल झाल्यामुळे होते.

 

>>>

Women Health: महिलांनो, तुम्हाला माहीत आहे का? गर्भधारणेनंतर मासिक पाळी का येत नाही? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.