Periods Health : पिरीयडमध्ये रक्तस्त्राव कमी होण्याची कारणे
Marathi October 09, 2024 03:24 AM

पिरीयड महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. एका विशिष्ट वयानंतर मुलींना पिरीयड अर्थात मासिक पाळी सुरू होते. दर महिन्याचे पिरीयडमधील त्या पाच दिवसात रक्तस्त्राव होतो. त्यामुळे कोणत्याही स्त्रिसाठी हे पाच दिवस नकोसे वाटतात, कारण या दिवसात होणारी वेदना नकोशी वाटते. पण कित्येकजणींना पाच दिवस न होता केवळ 2 ते 3 दिवसच रक्तस्त्राव होतो किंवा कमी रक्तस्त्राव होतो. कमी रक्तस्त्राव होण्याला अनेक कारणे सांगितली जातात. तुम्हालाही पिरीयडमध्ये रक्तस्त्राव कमी होत असेल तर यामागील काही साधारण कारणे पाहूयात,

रक्तस्त्राव कमी होण्याची कारणे-

जर तुम्हाला थॉयरॉइड असेल तर तुमच्या पिरीयडवर याचा परिणाम होऊ शकतो. कारण थॉयरॉइडच्या स्तरामध्ये बदल झाल्यावर त्याचा परिणाम पिरीयडच्या रत्कस्त्रावावर होतो. त्यामुळे तुम्हालाही असा बदल जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

– जाहिरात –

पीसीओडी, पीसीओएस ही समस्या सध्या बऱ्याच महिलांना जाणवते. या दोन्ही प्रकारच्या समस्यांमध्ये रक्तस्त्रावावर परिणाम होतो.

डॉक्टरांच्या मते, ज्या महिला गरजेपेक्षा जास्त व्यायाम करतात, अशा महिलांना पिरीयडमध्ये कमी रक्तस्त्राव होण्याची समस्या जाणवू शकते.

– जाहिरात –

जर तुमचे वय जास्त असेल आणि रजोनिवृत्तीच्या टप्प्यात जर तुम्ही असाल तर तुमच्या पिरीयडमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो.

पिरीयडमध्ये रक्तस्त्राव कमी होण्याला ताण हे कारण असू शकते. बदलत्या लाइफस्टाइलनुसार कित्येक महिला या समस्येतून जात आहेत. रोजच्या ताणतणावाला दूर करण्यासाठी तुम्ही योगा, संगीत, व्यायाम अशा गोष्टी करू शकता.

जर तुम्हाला कमी वयात पिरीयड येणे सुरू झाले असेल तर याचा परिणाम रक्तस्त्रावावर होऊ शकतो. काहींच्या बाबतीत तर जेमतेम डाग दिसतात, अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

वाढत्या वयानुसार पिरीयडमधील रक्तस्त्राव कमी होऊ शकतो. खरं तर, वाढत्या वयानुसार हार्मोनमध्ये बदलाव होत असतो, ज्याचा परिणाम महिलांच्या पिरीयडवर सुद्धा होतो.

ब्रेस्ट फीडिंग मुळे सुद्धा पिरीयडमधील रक्तस्त्राव कमी होऊ शकतो.

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तुम्हाला पिरीयडमध्ये रक्तस्त्राव कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आयर्नयुक्त आहार घ्यायला हवा.

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.