उमेश चांदिवडे यांचा कृषी सेवारत्न पुरस्काराने गौरव
esakal October 10, 2024 12:45 AM

17550

उमेश चांदिवडे यांना
कृषी सेवारत्न पुरस्कार
चिपळूण, ता. ९ ः खडपोली येथील उमेश चांदिवडे यांना राज्यस्तरीय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी कृषिक्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.
तालुक्यातील खडपोली गावातील नारायण चांदीवडे हे नोकरीनिमित्त अहमदनगर येथे गेले आणि त्याच ठिकाणी वास्तव्यात राहिले. त्यांना रवींद्र, रमेश आणि उमेश असे तीन मुलगे. रमेश सध्या पोलिस निरीक्षक पदावर मुंबई येथे कार्यरत आहेत. उमेश चांदिवडे हे आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे मंत्रालयात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे बालपण अहमदनगर येथे गेले. त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापिठातून बी.टेक् कृषी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून त्यांची नियुक्ती कक्ष अधिकारी पदावर करण्यात आली. सध्या ते कृषी विभाग मंत्रालय येथे अवर सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत कृषी क्षेत्रामध्ये ग्राम बीजोत्पादन, सेंद्रिय शेती परंपरागत कृषी विकास योजना, जमीन आरोग्यपत्रिका, कृषी विद्यापीठ मार्गदर्शन या क्षेत्रात भरीव कामगिरी करत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शनसुद्धा केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.