Ratan Tata Death: भारतमातेचा 'सच्चा सुपुत्र' गमावला; रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा; सर्व शासकीय कार्यक्रम रद्द
Saam TV October 10, 2024 12:45 PM

Ratan Tata Passed Away: देशातील प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समुहाचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला, अशीच भावना प्रत्येक भारतीय व्यक्त करत आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर आज राज्यभरात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

राज्यात एक दिवसाचा दुखवटा..

ज्येष्ठ उद्योगपती, यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १०) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही यांनी दिल्या आहेत. तसेच आज मुंबईमध्ये होणारे सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राज्य शासनाचे हे सर्व कार्यक्रम परवा घेण्यात येणार आहेत, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली!

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.