उपवासाची शिंगाडा बर्फी
Webdunia Marathi October 10, 2024 03:45 PM

साहित्य-

एक कप शिंगाडा पीठ

दोन चमचे तूप

एक कप दूध

3/4 कप साखर

काजू, बदाम

1/4 वेलची पूड

कृती-

सर्वात आधी एका कढईमध्ये तूप घालावे तसेच तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये शिंगाडा पीठ घालावे व भाजून घ्यावे पिठाचा रंग गोल्डन झाल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे करून दूध घालावे तसेच हे मिश्रण घट्ट होत असतांना यामध्ये साखर घालावी तसेच यांमध्ये काजू आणि बदाम तुकडे करून करून घालावे बर्फीची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये वेलची पूड घालावी व हे मिश्रण हलवून घ्यावे आता एका ताटलीला तूप लावून हे मिश्रण त्या ताटलीमध्ये पसरवून घ्यावे मिश्रण थंड झाल्यानंतर बर्फीच्या आकाराचा शेप देऊन कापून घ्यावे तर चला तयार आहे आपली शिंगाडा बर्फी, जी उपवासाला देखील चालते आणि दिवसभर थकवा देखील जाणवणार नाही

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.