रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्…., अशी झाली ‘नॅनो’ची निर्मिती
GH News October 10, 2024 04:12 PM

टाटा समूहाची सूत्र हाती घेतल्यानंतर रतन टाटांनी अनेक महत्त्वपूर्ण योजना आखल्या. भारतात संपूर्ण देशी बनावटीची कार तयार करावी, हे त्यांचं स्वप्न होतं. भारतीय बाजारपेठेत असणाऱ्या यापूर्वीच्या सर्व कार पूर्णपणे भारतीय बनावटीच्या नव्हत्या. रतन टाटांच्या या कल्पनांवर काम करत टाटा मोटार्सने इंडिका कार बाजारात आणायंच ठरवलं. ९० च्या दशकात अतिशय आव्हानात्मक कार्य होतं. रतन टाटा आणि टाटा मोटार्सने सर्व आव्हानं लिलया पेलत १९९८ ला इंडिकाची निर्मिती केली. जानेवारी १९९८ मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये रतन टाटांकडून इंडिका कार सादर करण्यात आली. डिसेंबर १९९८ मध्ये इंडिका बाजारात आली आणि सुरूवातीला कारची किंमत २ लाख ६० हजार ठेवली. त्यावेळी ही कार सर्वात आकर्षक कार ठरली. पहिल्याच आठवड्यात सव्वा लाख कार बुक झाल्यात. इंडिकाच्या वाढत्या मागणीमुळे इतर कंपन्यांवर त्यांच्या कारची किंमत कमी करण्याची वेळ आली. पहिलीच देशी बनावटीची कार असल्याने इंडिकाबाबत सुरूवातीला अनेक तक्रारी आल्या. त्या तक्रारी दूर करत नवी सुधारित आवृत्ती बाजारात आणली. आणि टाटांची इंडिका भारतात कमालीची लोकप्रिय कार ठरली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.