Happy Dasara Wishes in Marathi: आपल्या प्रियजनांना दसऱ्याला द्या सोन्यासारख्या शुभेच्छा! शेअर करण्यासाठी Download करा PHOTOS
Times Now Marathi October 11, 2024 08:45 PM

: दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक म्हणून ओळखला जातो. अश्विन शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून सीतेला सोडवले होते. तेव्हापासून दसरा साजरा करण्याची पद्धत आहे तसेच या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचेही दहन केले जाते. दसरा, दशहरा किंवा दशैन या नावाने ओळखला जाणारा हा सण प्रत्येक प्रातांनुसार वेगळा आहे. प्रत्येकाचे महत्त्व हे वेगळे आहे. दक्षिण भारतात दुर्गापूजेची समाप्ती होते तर उत्तर भारतात रामलीलेची. रामाने रावणाचा वध केला तर दुर्गा देवीने महिषासुराचा. या दिवशी दुर्गा आणि सरस्वती देवीच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे.

अनेकदा दसऱ्याला आपण काही कारणास्तव, परदेशी शिक्षण किंवा नोकरीमुळे आपल्या आप्तांना भेटू शकत नाही. तेव्हा अशावेळी आपण आपल्या आप्तांना, नातेवाईकांना सोशल मीडियाच्या माध्यमांतून शुभेच्छा देऊ शकता. तेव्हा खालील फोटो डाऊनलोड करून आपल्या आप्तांसमवेत तुम्ही ते शेअर करू शकता. हे पाहून तुमचे प्रियजन, मित्रमंडळ, जोडीदार नक्कीच खुश होतील. तेव्हा पाहुयात काही सुरेख शुभेच्छा ज्या तुम्ही शेअर करू शकता.

जल्लोष विजयाचा...
साडेतीन मुहूर्तांपैंकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा...
दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!


आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण...
प्रेमाचा ओलावा
करूनि दान...
शुभ दसरा..!


तत यशस्वी व्हा, असो तुमचं भाग्य खास,
तुमच्या वाटेवर फुलू देत नव्या स्वप्नांचा प्रवास...
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


साडेतीन मुहूर्तांपैंकी एक,
दसरा हा सण विजयाचा...
देवीने केला वध असूराचा,
दिन पराक्रमाचा, पौरूषाचा...
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली...
सोन्यासारखे तुम्ही आहातच...
सदैव असेच राहा...
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवण,
सोन्यासारख्या लोकांना,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


यंदा दसऱ्याचा शुभ मुहूर्त हा 12 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या असणार आहे. या दिवशी रवि योगासह सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. या योगात कोणतेही काम केल्यास ते यशस्वी होतील. दसऱ्याला रवि योग दिवसभर असल्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतील. तसेच सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल. दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 2 वाजून 3 मिनिटांपासून ते 2 वाजून 49 मिनिटांपर्यंत असेल.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.