Kartik hints Kiara's cameo Bhool Bhulaiyaa 3:कार्तिकने केला खुलासा, 'भूल भुलैया 3'च्या क्लायमॅक्समध्ये कियारा अडवाणीचा सहभाग?
Idiva October 16, 2024 01:45 PM

कार्तिक आर्यन आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3'चे जोरदार प्रमोशन करत आहे. अनीस बज्मी चित्रपटाबाबत संपूर्ण वातावरण तयार करत आहेत. भूल भुलैया 3 हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 1नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाबरोबरच रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. दोन्ही मोठ्या चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे चित्रपटाची कास्ट जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच आता कार्तिक आर्यन च्या तोंडातून एक मोठी गोष्ट बाहेर पडली आहे.कार्तिकने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे.

instagram

कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत चुकून कियारा अडवाणीचं नाव घेतल्यामुळे तिच्या भूल भूलैय्या ३ मधील पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आलं आहे. कार्तिकने सांगितलं की त्यांनी चित्रपटाच्या दोन क्लायमॅक्स शूट केले होते आणि एका दृश्यात त्याचं काम कियारासोबत होतं. मात्र, त्याने ताबडतोब विद्या बालनचा उल्लेख करून चुकीचं सांगितलं असं म्हणत विषय बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कियारा या चित्रपटात दिसणार का? असा प्रश्न आता येथे उपस्थित होत आहे.

कार्तिक काय म्हणाला

मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की,तो म्हणाला, 'जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, खरं तर कियारासोबत शूटिंग करत होतो...' यानंतर कार्तिक थांबला आणि म्हणाला, 'माफ करा. म्हणजे जेव्हा आम्ही विद्याजींसोबत शूटिंग करत होतो. यानंतर कार्तिकने विचारले, हे लाइव्ह नाही ना?'पुढे कार्तिक म्हणाला चित्रपटाचे दोन क्लायमॅक्स शूट करण्यात आले आहेत. हे फक्त चार लोकांना सांगण्यात आले आणि हे पाहून लोक थक्क होतील.

क्लायमॅक्स गुप्त ठेवला

कार्तिक आर्यन दोन क्लायमॅक्सवर एका वेब पोर्टलशी बोलताना सांगितले, 'मला वाटते की आणखी एक किंवा दोन जणांना खऱ्या क्लायमॅक्सबद्दल माहिती असेल. पण हो, दोन क्लायमॅक्स शूट झाले आहेत. जेव्हा स्क्रिप्ट आमच्याकडे आली तेव्हा फक्त 5 लोकांना 15 पाने देण्यात आली होती.मला तुम्हाला सांगायचे आहे की आम्ही दोन क्लायमॅक्स शूट केले आहेत. इतक्या गोष्टी लपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा एक वेगळा चित्रपट आहे. भूल भुलैया 3 मध्ये तुमच्यासाठी खूप सरप्राईज असतील.

instagram

आता एका मुलाखतीदरम्यान, कार्तिक आर्यनच्या तोंडून काहीतरी बाहेर पडले ज्यामुळे असे दिसते की क्लायमॅक्स कियारा अडवाणीशी संबंधित आहे. कार्तिक ज्या सप्राईज बद्दल बोलत आहे ते सप्राईज कदाचित भूल भुलैया 3 मध्ये कियारा अडवाणी तर नाही ना असा प्रश्न आता विचारला जात आहे.

हेही वाचा : Birthday Special: अली फजल याच्या उत्तम प्रोजेक्ट्सचा एक धावता धांडोळा

दरम्यान, 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'भूल भुलैया 2' या हॉरर कॉमेडी चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या जोडीने लोकांची मने जिंकली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही चाहत्यांना खूप आवडली. आता कार्तिक आर्यन या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागासह पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, यावेळी कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांची जोडी चित्रपटाच्या तिसऱ्या भागात म्हणजेच 'भूल भुलैया 3'मध्ये दिसणार आहे.भूल भूलैय्या ३ या चित्रपटाचा प्रीमियर १ नोव्हेंबर २०२४ ला होणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.