राज्यात पुढचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. येत्या 26 नोव्हेंबरला राज्यात महाविकास आघाडीचं नवीन सरकार स्थापन होईल, याबद्दल कोणतीही शंका नाही. सरकार आम्हीच स्थापन करणार आहोत, असा विश्वास शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे,अजित पवार यांचा खेळ निवडणुकीत भाजपच संपवेल. भारतीय जनता पक्ष हा मदारी आहे.आणि बाकीची सगळं माकडं आहेत. भाजप या माकडांना आपल्या तालावर नाचवणार आणि नंतर सोडून देणार अशी टीकाही राऊत यांनी केली.
अमित शाह, भाजपने कोणताही त्याग केला नाही. अमित शाहांना महाराष्ट्रावर सूड उगवायचा होता. भाजपला शिवसेना तोडायची होती. अमित शाह यांनी महाराष्ट्राची फक्त लूट केली असा आरोपही संजय राऊत यांनी केला.