लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे विरोधक गडबडले – अजित पवार
GH News October 16, 2024 04:12 PM

महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीची काल घोषणा झाली. त्यानंतर आजा महायुतीची पत्रकार परिषद पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा लेखाजोगा मांडला. दोन अडीच वर्षाच्या कामगिरीचा अहवाल मांडला.

आमच्या समोरचे लोकं (विरोधक) सातत्याने फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते. आधी ओरडत होतो की निवडणुका 2-3 टप्प्यात घेतील, 1 दिवसांतच घेतील, असं ओरडत होते. पण हे सगळं निवडणूक आयोगाच्या हातात असतं, त्यांचा अधिकार आहे.

शेवटच्या अर्थसंकल्पान आम्ही विचारपूर्वक योजना दिल्या, त्याचीही टिंगलटवाळी केली. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे. महिलांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सगळ्या समाजातील गरीब महिलांन न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला असं अजित पवार म्हणाले.

विरोधकांवर टीका

आमचे विरोधक गडबडलेले आहेत. घाबरलेले नाही म्हणणार, लाडकी बहीण योजनेमुळे ते गडबडले. ही योजना लागू होणार नाही असं म्हणायचे. फॉर्म रिजेक्ट होतील असं म्हणणार नाही. काही तारतम्य बाळगलं नाही टीका करताना. महिलांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत असेल असं सांगितलं जात आहे. पण ही योजना तात्पुरता नाही, असा शब्द अजित पवार यांनी जनतेला दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.