IND vs NZ : टीम साऊथीचा धमाका, वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड ब्रेक
GH News October 18, 2024 06:15 PM

टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या टीम साऊथीने इतिहास घडवला आहे. गोलंदाज असलेल्या टीम साऊथी याने चक्क बॅटिंगने धमाका केला. टीमने 65 धावांची खेळी केली. टीमने या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार खेचले. तसेच टीमने रचीन रवींद्र याला अप्रतिम साथ दिली. टीम आणि रचीन या जोडीने आठव्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली आणि न्यूझीलंडला भक्कम स्थितीत आणून ठेवलं. टीमने 73 बॉलमध्ये अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचा रेकॉर्ड उध्वस्त केला. टीमने सेहवागचा कसोटीतील सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला. टीम यासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार खेचणारा सहावा फलंदाज ठरला आहे. तर सेहवागची सातव्या स्थानी घसरण झाली आहे.

वीरेंद्र सेहवागने 104 कसोटीत 91 षटकार लगावले होते. सेहवाग टीम इंडियाकडून कसोटीत सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला फलंदाज आहे. तर साऊदीने टीम इंडिया विरूद्धच्या या कसोटी सामन्यातील खेळीत एकूण 4 सिक्स लगावले. टीमच्या नावावर यासह 93 सिक्सची नोंद झाली आणि त्याने सेहवागला मागे टाकलं आहे. टीमने मोहम्मद सिराजच्या बॉलिंगवर हा रेकॉर्ड ब्रेक सिक्स ठोकला. टीमने सिराजच्या बॉलिंगवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम जडेजाच्या हाती कॅच आऊट झाला. टीमने 65 धावांची खेळी केली. टीमच्या कसोटी कारकीर्दीतील ही चौथी मोठी धावसंख्या ठरली. तसेच त्याच्या कसोटी कारकीर्दीतील हे सातवं अर्धशतक ठरलं.

सर्वाधिक सिक्सचा विक्रम कुणाच्या नावावर?

दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या नावावर आहे. स्टोक्सने 106 कसोटीत 131 सिक्स लगावले आहेत. दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमन आहे. ब्रँडनने 107 सिक्स ठोकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर फलंदाज एडम ग्रिलख्रिस्ट 100 सिक्ससह तिसऱ्या स्थानी आहे.

टीम साऊथीचा सेहवागला ‘दे धक्का’

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.