Winter Travel: फक्त 'काश्मीरच' नाही, तर भारतात 'ही' ठिकाणंही स्वर्गापेक्षा कमी नाही! फार लोकांना माहित नाही, एकदा पाहाल तर प्रेमात पडाल!
ज्योती देवरे October 19, 2024 01:13 PM

Winter Travel: ते म्हणतात ना, पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो काश्मीरमध्ये आहे. काश्मीर भारतातील असं एक ठिकाण आहे, जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. कारण इथलं निसर्गसौंदर्य, थंड वातावरण, बर्फाचे डोंगर तुम्हाला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. जेव्हा जेव्हा हिल स्टेशनच्या प्रवासाची चर्चा होते, तेव्हा बरेच लोक प्रथम जम्मू-काश्मीरचे नाव घेतात. जम्मू-काश्मीरचे सौंदर्य एखाद्या सुंदर स्वर्गापेक्षा कमी नाही हे खरे आहे. त्यामुळे येथे स्थानिकच नव्हे तर विदेशी पर्यटकही दर महिन्याला हजारोंच्या संख्येने येतात.

भारतातील 'ही' अद्भुत ठिकाणं, जी काश्मीरपेक्षा कमी नाहीत!

काश्मीर आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु या देशात अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक ठिकाणे आहेत, ज्यांना काश्मीर म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी नंदनवनही पाहायला मिळते. या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना काश्मीर असेही म्हणतात.


तोष - काश्मीर प्रमाणेच मनमोहक आणि अद्भुत ठिकाण 

हिमाचल प्रदेशातील सुंदर खोऱ्यांमध्ये असलेले मनमोहक आणि अद्भुत ठिकाण काश्मीर प्रमाणेच ओळखले जाते, तर त्याचे नाव तोश आहे. हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात असलेल्या तोशमध्ये दर महिन्याला हजारो पर्यटक येतात. समुद्रसपाटीपासून सुमारे 2 हजार मीटर उंचीवर वसलेले तोश गाव जम्मू-काश्मीरच्या सौंदर्यालाही टक्कर देते. येथील दृश्ये आणि सौंदर्य अगदी काश्मीरसारखे आहे. बर्फवृष्टीतही तोश काश्मीरसारखाच दिसतो. बर्फवृष्टीदरम्यान हे गावही बर्फाने झाकून जाते. काश्मीरप्रमाणेच इथल्या नद्या एखाद्या काचेप्रमाणे स्वच्छ दिसतात.


औली - मिनी काश्मीर, स्वप्नातलं ठिकाण!

उत्तराखंडच्या सुंदर खोऱ्यांमध्ये वसलेले औली हे असे ठिकाण आहे, जिथे भेट देण्याचे जवळजवळ प्रत्येकजण स्वप्न पाहतो. उंच पर्वत, देवदाराची मोठी झाडे, गवताळ प्रदेश आणि तलाव आणि धबधबे औलीच्या सौंदर्यात भर घालतात. औलीचे सौंदर्य आणि हिमवर्षाव इतके लोकप्रिय आहे की, त्याला उत्तराखंडचे काश्मीर असेही म्हणतात. अनेकजण याला मिनी काश्मीर म्हणूनही ओळखतात. जेव्हा येथे बर्फवृष्टी होते तेव्हा बहुतेक पर्यटक भेट देण्यासाठी येतात. इथली दृश्येही हुबेहुब काश्मीरसारखी दिसतात. येथील बर्फवृष्टीत साहसी उपक्रम करण्यात एक वेगळीच मजा आहे.

मेचुका व्हॅली - ईशान्येचे काश्मीर

सौंदर्याचा खजिना केवळ हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडमध्येच नाही तर देशाच्या ईशान्य भारतातही पाहायला मिळतो. देशाच्या या भागात अशी अनेक भव्य आणि आश्चर्यकारक ठिकाणे आहेत, जी सौंदर्याच्या बाबतीत जम्मू-काश्मीर आणि इतर अनेक ठिकाणांशी स्पर्धा करतात. अरुणाचल प्रदेशात स्थित मेचुका व्हॅली हे एक ठिकाण आहे जे ईशान्येचे काश्मीर मानले जाते. मोहक पर्वत, गवताळ प्रदेश आणि तलाव आणि धबधबे या घाटीच्या सौंदर्यात भर घालतात. मेचुका व्हॅलीमध्ये बर्फ पडतो, तेव्हा दरी पांढऱ्या रंगाची दिसते. येथील दृश्ये काश्मीरलाही स्पर्धा देतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.

Winter Travel: गोव्याक जातंस..? गर्दीपासून दूर, आजूबाजूची 'ही' ठिकाणं अनेकांना माहित नसावी, पाहाल तर परदेश विसराल!

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.