यंदा मुहूर्त ट्रेडिंग 31 ऑक्टोबरला होणार की 1 नोव्हेंबरला? जाणून घ्या नेमकी तारीख!
प्रज्वल ढगे October 19, 2024 05:13 PM

Diwali Muhurat Trading 2024: इस साल कब होगी दिवाली मुहूर्त ट्रेडिंग, 31 अक्टूबर या 1 नवंबर, जानिए इसका महत्त्व
Muhurat Trading: दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर मुहूर्त ट्रेडिंगचे विशेष सेशन राबवले जाते. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या दोन्ही शेअर बाजारांवर ही मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केली जाते. मात्र ही ट्रेडिंग नेमकी कधी होणार? याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे यावेळी मुहूर्त ट्रेडिंग नेमकी कधी होणार?  हे जाणून घेऊ या... 

 बीएसई आणि एनएसईवर हिंदू पंचांगानुसार दिवाळीपासूनच्या नव्या आर्थिक वर्षाच्या निमित्ताने एका तासाचे विशेष ट्रेडिंग सेशन राबवले जाते. याच एका तासाच्या ट्रेडिंगला मुहूर्त ट्रेडिंग म्हटले जाते. यावर्षीदेखील मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केली जाईल.  

कोणत्या दिवशी होणार मुहूर्त ट्रेडिंग 

मुहूर्त ट्रेडिंगला लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) केले जाते. यावेळच्या मुहूर्त ट्रेडिंगबाबत बीएसई आणि एनएसईकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. असे असले तरी या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या ट्रेडिंगबाबत बीएसई आणि एनएसई नंतर माहिती देतील. बीएसईच्या संकेतस्थळानुसार या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मोठे चढउतार

भारतीय स्टॉक ब्रोकर्स दिवाळीच्या दिवसाला नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानतात. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी अगदी काही तासांची ट्रेडिंग होत असली तरी या दिवशी ब्रोकर्स, ट्रेटर्स ट्रेडिंगमध्ये उत्साहाने सहभागी होतात. छोट्या गुंतवणूकदारांनी मात्र मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कारण या दिवशी शेअर बाजारात मोठे चढउतार येतात. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. 

Gold Rate : सोन्याला पुन्हा झळाळी! दिवाळीपूर्वी थेट 80 हजारांच्या पुढे जाणार? वाचा आजचा भाव काय?

पुढच्या दिवाळीत पैशांचा पाऊस? 'हे' पाच स्टॉक 5 वर्षांत देणार50 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स

इन्फोसिस कंपनी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; दुसऱ्या तिमाहीत नफा वाढल्याने घेतला मोठा निर्णय!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.