Vijaya Rahatkar: विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अर्चना मुजुमदार असतील नव्या सदस्य
esakal October 19, 2024 07:45 PM

नवी दिल्ली : भाजप नेत्या विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर डॉ. अर्चना मुजुमदार या आयोगाच्या नव्या सदस्या असतील. विजया रहाटकर यांनी यापूर्वी महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळं त्यांचं एकाअर्थी प्रमोशन झालं असून त्यांच्यावर आता देशाच्या महिला आयोगाची जबाबदारी असणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.