IND vs NZ 1st Test : Rohit Sharma संतापला; न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मैदान सोडले, भारतीय खेळाडूंचा Umpire सोबत वाद
esakal October 20, 2024 02:45 AM

India vs New Zealand 1st Test : न्यूझीलंडने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर वर्चस्व गाजवलेले दिसतेय. भारताचा पहिला डाव ४६ धावांवर गुंडाळून त्यांनी ४०२ धावा उभ्या केल्या. ३५६ धावांची पिछाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारताने आघाडी घेतली. पण, सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. सर्फराजच्या विकेटनंतर पुढील ५४ धावांत भारताचे ७ फलंदाज माघारी परतले आणि न्यूझीलंडसमोर १०७ धावांचे माफक लक्ष्यच उभे राहिले. त्यात दिवस संपायला २० षटकांचा खेळ शिल्लक असताना अम्पायरने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधार रोहित शर्माचा पारा चढला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.