उत्तराला नकार देत अरफिन सलमानशी नडला, मग सलमाननेही दिले शाल जोडीतले.. बिग बॉसच्या घरात खरडपट्टीला सुरुवात
जयदीप मेढे October 20, 2024 04:43 PM

Bigg Boss 18: बिग बॉसचा यंदाचा आठवडा अनेक घटनांनी भरलेला होता. एकीकडे सलमान खानला बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमक्या तर दुसरीकडे 'विकेंड का वार' मध्ये त्याची उपस्थिती लागते की नाही यामुळे. तर घरात रेशनवरून नवेच रामायण सुरू होते. बिग बॉसच्या 18 व्या पर्वात  'टाईम गॉड'चा टास्क आल्यानंतर घरात चांगलेच तांडव झाल्याचे दिसले. 'विकेंड का वार'मध्ये बिग बॉस 18 चा होस्ट सलमान खान याने घरातील शांतता भंग करणाऱ्या स्पर्धाकांचा वर्ग घेतलाच दिसले. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घराचा पहिला टाईम गॉड ठरलेला आफरीन खानही सलमानच्या तावडीत सापडलेला दिसला. 

आफरीन खानची ओळख ऋतिक रोशन चा मित्र आणि लाईफ कोच अशी केली जाते. बिग बॉस 18 च्या घरात तो पत्नी सारा सोबत आला होता तेव्हापासून हे दोघेही चर्चेत आहेत. अलीकडेच त्याचे अविनाश मिश्रा सोबत जोरदार भांडण झाले आणि आता 'विकेंड का वार' मध्ये तो चक्क सलमान खानशी भिडताना दिसत आहे. सलमानने अरफीनला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला त्यांना स्पष्ट नकार दिला आहे. 

नक्की काय दाखवलंय प्रोमोमध्ये?

कलर्स टीव्ही ने शेअर केलेला एका प्रोमो मध्ये सलमान खानने आर्फिनला त्याचा हावभावाविषयी प्रश्न विचारला. त्यावर ती माझी प्रोसेस आहे असं म्हणत त्यानं त्याच्या हावभावाचं कारण देण्यास स्पष्ट नकार दिला. त्याच्या उद्धट उत्तराने सलमानही त्याच्यावर संतापलेला दिसला. यावर याचे अनेक अर्थ निघतात असं म्हणत सलमानने अरफिनला चांगलंच सुनावल्याचं दिसलं. या व्यवसायात तुम्हाला शिकवलं गेलं नाही का की दुसऱ्यांचा ऐकून घ्यायला हवं असा सवाल करत सलमानने अरफीनला  विचारल्याच दिसलं.

सलमाननेही दिले शाल जोडीतले 

अरफीनच्या उत्तरावर संतापलेल्या सलमान खानने तुम्ही तर शिकलेले लोक... बाकी सगळे तर मूर्ख आहेत मला धरून... कसम खुदा की मला तिथे येऊन हे सगळं सावरायला हवं असं म्हणतानाचा हा प्रोमो कलर्स टीव्हीने शेअर केलाय. अरफीनच्या हावभावावर बोट ठेवल्यानंतर त्याची उत्तर देण्याची वृत्ती पाहून सलमान खान संतापला. तो म्हणाला, "तुम्ही शिकलेले लोक आहात मित्रा. बाकी सगळे मूर्ख आहेत, माझ्यासह." अरफीन पुन्हा पुन्हा स्वतःला न्याय देत होता आणि अभिनेत्याचाही संताप वाढला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

याचे अनेक अर्थ निघतात...

खांद्यावर हात झटकत असे तु का करतोस? असे विचारल्यावर आरफिनने ते सांगण्यास स्पष्ट नकार दिला. मग भाईजानने त्याला त्याचे अनेक अर्थ सांगितले, ज्यात एक धमकीचा हावभाव देखील होता. आरफिन तुमच्या व्यवसायात तुम्हाला समोरच्याचे ऐकून घ्यावे हे शिकवले नाही का? असे सलमान म्हणाला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.